इस्लामाबाद: आज देश हळहळला. देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ ही दुर्घटना घडली. रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. एकच अधिकारी वाचला आहे. रावत यांच्या निधनावर देश-विदेशातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये पाकिस्तानचादेखील समावेश आहे.
पाकिस्तानने देखील रावत यांच्या अपघाती निधनावर शोक व्यक्त केले आहे. पाकिस्तानचे चेअरमन जॉईंट चिफ्स ऑफ स्टाफ कमिटी (CJCSC) लेफ्टनंट जनरल नदीम राजा आणि चीफ ऑफ द आर्मी स्टाफ (COAS) जनरल कमर जावेद बाजवा यांनी रावत आणि अन्य अधिकाऱ्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्याने ट्विट करून याची माहिती दिली आहे.
अमित शहाभारताने मातृभूमीची निष्टेने सेवा करणारा सच्चा सैनिक गमावल्याची भावना शहांनी व्यक्त केली. ट्विटरवर गृहमंत्री अमित शाह यांनी लिहिले- 'आज देशासाठी एक अतिशय दुःखद दिवस आहे. भारताने सीडीएस जनरल बिपिन रावत जी यांना एका अत्यंत दुःखद अपघातात गमावले. मातृभूमीची अत्यंत निष्ठेने सेवा करणाऱ्या शूर सैनिकांपैकी ते एक होते. त्यांचे देशाबद्दलचे योगदान आणि वचनबद्धता शब्दात वर्णन करता येणार नाही.'
राष्ट्रपती रामनाथ कोविंददेशाने एक पराक्रमी पूत्र गमावला, अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली. हेलिकॉप्टर दुर्घटनेत सर्व अधिकाऱ्यांचे निधन झाले हे वेदनादायी आहे. जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्या अकाली निधनाने मला धक्का बसला आहे. देशाने आपला एक शूर पुत्र गमावला आहे. मातृभूमीसाठी त्यांची चार दशके नि:स्वार्थ सेवा केली, जी शौर्य आणि पराक्रमाने चिन्हांकित होती. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना, असे ट्विट कोविंद यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजनरल बिपीन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक होते. एक सच्चा देशभक्त, ज्याने आपल्या सशस्त्र दलांचे आणि सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात मोठे योगदान दिले. सामरिक बाबींवर त्यांची अंतर्दृष्टी आणि दृष्टीकोन महत्वपूर्ण होते. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. ओम शांती, अशा शब्दांत मोदींनी रावत यांना श्रद्धांजली वाहिली.