नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये लागू असणारे ३७० कलम हटवल्यावर पाकिस्तानने चांगलाच कांगावा सुरु केला आहे. भारताने घेतलेल्या या निर्णयानंतर जगभरात राहणारे पाकिस्तानी नागरिक भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभे टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. याच कारणासाठी दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेऊलमध्ये एकत्र आलेल्या नागरिकांना मात्र भारताच्या तीन नागरिकांनी थेट उत्तर दिले आहे. त्यात एका महिलेचाही समावेश आहे. देशाच्या विरोधात सुरु असलेल्या घोषणाबाजीला त्यांनी तितक्याच आक्रमकपणे तोंड दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत सहभागी झालेली महिला आणि भाजप नेत्या शाझिया इल्मी यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,शुक्रवारी(दि.16) भाजपा नेत्या शाझिया इल्मी या काही आरएसएस नेत्यांसह सेऊलमध्ये भारतीय दुतावासात गेल्या होत्या. तिथून काही अंतरावर शेकडो पाकिस्तानी समर्थकांचा जमाव भारतविरोधी घोषणाबाजी करत असल्याचे त्यांना समजले. त्यावर त्यांनी तात्कळ तिथे जाऊन संबंधित जमावाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही ऐकूण घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर 'मोदी मुर्दाबाद, पाकिस्तान झिंदाबाद आणि भारत दहशतवादी' अशा घोषणा देणाऱ्या जमावासमोर त्यांनी ‘भारत जिंदाबाद’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ च्या घोषणा देत ठासून प्रत्युत्तर दिले. त्यांच्यासह अन्य दोन नेत्यांनीही भारत जिंदाबादच्या घोषणा दिल्या.
यानंतर परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून स्थानिक पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शाझिया इल्मी यांचं भारतीय नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे. अखेर परिस्थिती कोणताही अनुचित प्रकार घडण्याआधी स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमात बघितला जात असून सर्वत्र शाझिया इल्मी यांच्या धाडसाची प्रशंसा केली जात आहे.