लंडन : एका अहवालानुसार ब्रिटनमधील जातीय अल्पसंख्याक समुदायाची लोकसंख्या २०५० दुप्पट होईल. देशाच्या एकूण लोकसंख्येचा एकतृतीयांश भाग व्यापतील. यात भारतीय वंशाच्या नागरिकांचाही समावेश आहे. विचारगट ‘पॉलिसी एक्स्चेंज’ नुसार अश्वेत व अल्पसंख्याक जातीय समुदायाची लोकसंख्या गौरवर्णीयांच्या तुलनेत मोठ्या झपाट्याने वाढत आहे. गौरवर्णीयांची लोकसंख्या स्थिर राहिली. यामुळे ब्रिटिश लोकसंख्येचा चेहरामोहराच बदलत आहे. यात प्रामुख्याने भारतीय, पाकिस्तानी, बांगलादेशी, कृष्णवर्णीय आफ्रिकी आणि कृष्णवर्णीय कॅरेबियन यांचा समावेश आहे. लोकसंख्या २०५० पर्यंत वाढून देशाच्या तुलनेत २० ते ३० टक्के होईल. लंडन, मॅनचेस्टर व बर्मिंगहॅम यांसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात हे समूह वास्तव्य करतात. (वृत्तसंस्था)
ब्रिटनमध्ये दुपटीने वाढणार कृष्णवर्णीय अल्पसंख्याक
By admin | Published: May 07, 2014 3:26 AM