शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

Sri Lanka bomb blasts : श्रीलंकेची राजधानी कोलंबो पुन्हा हादरले, पुगोडा शहरात जोरदार स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 10:26 AM

श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये गुरुवारी (25 एप्रिल) पुन्हा स्फोटाचा आवाज आला आहे. पुगोडा शहरात जोरदार स्फोट झाला असून राजधानी कोलंबोपासून 40 किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.

ठळक मुद्देजगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना रविवारी श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले.कोलंबोमध्ये गुरुवारी (25 एप्रिल) पुन्हा स्फोटाचा आवाज आला आहे. पुगोडा शहरात जोरदार स्फोट झाला असून राजधानी कोलंबोपासून 40 किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. 

कोलंबो - श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये गुरुवारी (25 एप्रिल) पुन्हा एकदा स्फोटाचा आवाज आला आहे. पुगोडा शहरात जोरदार स्फोट झाला असून राजधानी कोलंबोपासून 40 किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना रविवारी श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटात 359 हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर 500 हून अधिक जण जखमी झाले. या घटनेनंतर संपूर्ण श्रीलंकेत भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोलंबोतील साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने स्वीकारली आहे. रविवारी घडवून आणलेल्या या साखळी बॉम्बस्फोटांमुळे आतापर्यंत सुमारे 359 जणांचा मृत्यू झाला असून, शेकडोजण जखमी झाले आहेत. दरम्यान, ख्राईस्टचर्च येथील मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी श्रीलंकेमध्ये चर्च आणि हॉटेलला लक्ष्य करून हे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आल्याचे श्रीलंकन सरकारने संसदेत सांगितले होते.  श्रीलंकेतील स्थानिक इस्लामी कट्टरवादी संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) हिचा या साखळी बॉम्बस्फोटांमागे हात असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र कुठल्याही संघटनेने आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नव्हती. अखेरीस इस्लामिक स्टेटने या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली. इस्लामिक स्टेट या दहशतावी संघटनेने अल अमाक या यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिले होते. 

 

श्रीलंका बॉम्बस्फोटातील आत्मघाती हल्लेखोराचा VIDEO व्हायरल 

श्रीलंकेतील एका आत्मघातकी बॉम्बस्फोटाचा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओसमोर आला आहे. यामध्ये एक तरुण खांद्यावर बॅग घेऊन चर्च परिसरात पोहोचला होता. त्याच्या हातात स्फोट घडवण्यासाठी रिमोट होता. चर्चमध्ये पोहोचल्यानंतर काही वेळानंतर त्याने स्फोट घडवून आणला. श्रीलंकेमध्ये साखळी बॉम्बस्फोटामुळे  भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी देशात आणीबाणी लागू केली. जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेतील कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले. कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाले होते. 

 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाsri lanka bomb blastश्रीलंका बॉम्ब स्फोटBlastस्फोटDeathमृत्यू