पश्चिम आफ्रिकेतील घाना या देशात भीषण स्पोट झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी झालेल्या स्फोटात 17 जणांचा मृत्यू तर 59 जण जखमी झाले आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या पश्चिम भागात हा स्फोट झाला. सरकारच्या म्हणण्यानुसार, खाणकामात वापरली जाणारी स्फोटके वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये हा स्फोट झाला आहे.
नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलेगुरुवारी सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ समोर आला. ज्यामध्ये डझनभर इमारती एकतर कोसळल्या आहेत किंवा ढिगाऱ्यात बदलल्या आहेत. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, खाणकामात वापरली जाणारी स्फोटके घेऊन जाणारे वाहन एका मोटारसायकलला धडकले, ज्यामुळे हा स्फोट झाला. पूर्वीप्रमाणे परिस्थिती सामान्य होईपर्यंत लोकांना त्यांच्या सुरक्षेसाठी अपघातस्थळावरुन इतर शहरात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
500 इमारती उद्वस्तनॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑर्गनायझेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या स्फोटात 500 इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. हा स्फोट देशाच्या पश्चिम भागातील बोगोसो आणि बावडी या शहरांमध्ये वसलेल्या अपिएटमध्ये झाला. येथे कॅनेडियन किनरॉस कंपनीद्वारे संचालित चिरानो सोन्याच्या खाणीकडे जात असलेल्या स्फोटकांनी भरलेल्या ट्रकखाली एक मोटरसायकल आली होती. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण खाणीपासून 140 किलोमीटर अंतरावर आहे.