अफगाणिस्तानातील हेरातमधील गुजरगाह मशिदीत शुक्रवारच्या नमाजदरम्यान मोठा स्फोट झाला आहे. टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, या स्फोटातमशिदीचे इमाम मुजीब इमाम रहमान अंसारींसह 15 जणांचा मृत्यू झाला आहे. हेरातच्या गव्हर्नर प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एक आत्मघातकी हल्ला होता. हेरातचे पोलीस प्रवक्ते महमूद रसोली यांनी दिलेल्या महितीनुसार, मुजीब रहमान अंसारी यांचा, काही गार्ड आणि नागरिकांसह मशिदीकडे जातांना मृत्यू झाला.
मशिदीच्या इमामांना तालिबानचे समर्थक असल्याचे बोलले जात आहे. मुजीब रहमान अंसारी यांनी जूनच्या अखेरीस आयोजित हजारो विद्वानांच्या आणि वृद्धांच्य सभेत तालिबानच्या बचावात दृढतेने भाष्य केले होते.आम्ही साधारणपणे एक वर्षांपूर्वी सत्तेवर आलो, यानंतर देशाच्या सुरक्षिततेत सुधारणा केली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत स्फोट झाले आहेत. यांत मशिदींना निशाणा बनविण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांतही अफगाणिस्तानात होणाऱ्या हल्यांसंदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे अफगाणिस्तानात यापूर्वीही असे अनेक स्पोट झाले आहेत. मात्र, यावेळी झालेल्या स्फोटाची तीव्रता अधिक मोठी होती असेल सांगण्यात येत आहे.