जिनिव्हा : आपल्या श्रेणीतील सर्वात मोठा चमकदार निळा हिरा (नीलमणी) अर्थात ‘द ब्लू’ला येथील एका लिलावात तब्बल २३.७९ दशलक्ष डॉलर मिळाले. ख्रिस्ती कंपनीतर्फे आयोजित ‘मॅग्निफिसंट ज्वेल’ या लिलावात ‘द ब्लू’साठी तगडी बोली लागली. १३.२२ कॅरेटचा हा निर्दोष हिरा ‘द ब्लू’ म्हणून ओळखला जातो. सुथबी या लिलावकर्त्या कंपनीने १०० कॅरेटचा निर्दोष पिवळा हिरा १६.३ दशलक्ष डॉलरला विकल्याच्या दुसर्या दिवशी द ब्लूला त्याहून कितीतरी अधिक किंमत मिळाली. गेल्या नोव्हेंबरमध्ये ख्रिस्तीच्याच जिनिव्हातील लिलावात जगातील सर्वात मोठ्या नारंगी हिर्याला ३५. ५ दशलक्ष डॉलर मिळाले होते. अमेरिकेतील दागिन्याचे विक्रेते हॅरी विन्सटन यांनी एका अनाम विक्रेत्याकडून द ब्लू खरेदी केला. (वृत्तसंस्था)
‘द ब्लू’ला मिळाले २३.७९ दशलक्ष डॉलर
By admin | Published: May 16, 2014 5:18 AM