यंगून : वायव्य म्यानमातील समुद्रात घडलेल्या भीषण बोट दुर्घटनेत ३३ जण ठार झाले असून जवळपास १२ जण बेपत्ता आहेत. लाटांच्या तडाख्याने ही दुमजली बोट (आंग तागुन-३) शुक्रवारी बुडाली. बचाव पथकाला १६७ लोकांना वाचविण्यात यश आले असून यापैकी बऱ्याच लोकांना त्यांच्या घरी रवाना करण्यात आल्याचे म्यानमा रेडक्रॉस आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख माऊंग खिन यांनी सांगितले.३३ ठार, अनेक बेपत्ताया दुर्घटनेत ३३ जण ठार झाले असून अनेक जण बेपत्ता आहेत. बचाव पथक त्यांचा शोध घेत आहेत. शुक्रवारी रात्री स्थानिक वेळेनुसार साडेआठ वाजता ही बोट क्याऊक्फू येथून रवाना झाली होती. ८० किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर लाटेच्या तडाख्याने ही दुर्घटना घडली. मृतांची संख्या वाढविण्याची शक्यता आहे.
म्यानमामध्ये बोट दुर्घटना; ३३ ठार, अनेक बेपत्ता
By admin | Published: March 15, 2015 1:54 AM