जॉर्जियातील गुदौरी भागात एका रिसॉर्टमध्ये 12 भारतीय नागरिकांचे मृतदेह आढळ्याने खळबळ उडाली आहे. आता या सर्वांच्या मृत्यूबाबत धक्कादायक कारण समोर आले आहे. जनरेटरमधून लीक झालेल्या कार्बन मोनोऑक्साइड गॅसमुळे सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय उच्चायुक्तांनी दिलीआहे. जॉर्जियाच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने कुणाच्याही अंगावर जखमा किंवा मारहाणीच्या खुणा नसल्याचे म्हटले आहे.
मीडिया रिपोर्ट्स आणि स्थानिक पोलिसांच्या अहवालानुसार, सर्वांचा मृत्यू कार्बन मोनोऑक्साइडच्या गळतीमुळे झाला आहे. रेस्टॉरंटच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बेडरुमजवळ जनरेटर ठेवण्यात आले होते. लाईट गेल्यामुळे जनरेटर चालू झाले आणि यातून येणारा कार्बन मोनॉक्साईड गॅस बंद खोलीत जमा झाला. या गॅसमुळे खोलीतील सर्वांचा गुदमरून मृत्यू झाला.
गुन्हा दाखलजॉर्जिया पोलिसांनी या घटनेबाबत फौजदारी संहितेच्या कलम 116 अंतर्गत निष्काळजीपणाने हत्येचा गुन्हा/सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी तपास करत असून फॉरेन्सिक चाचण्यांद्वारे मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतर सुरक्षेच्या निकषांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषत: बंद जागांवर जनरेटरच्या वापराबाबत गंभीर चर्चा होत आहे.