ऑनलाइन टीम अबुजा (नायजेरीया), दि. १० - बोको हराम या दहशतवादी संघटनेने पुन्हा २० महिलांचे अपहरण केले आहे. या पूर्वीही त्यांनी २०० विद्यार्थीनींचे अपहरण केले होते. या महिला छिबॉक या गावातील रहिवासी आहेत. बोको हराम च्या दहशतवाद्यांनी गावातील महिलांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांना गाडीत बसायला भाग पाडले. तसेच त्या महिलांच्या अपहरणाला विरोध करणा-या तीन पुरूषांनाही त्यांनी आपल्या सोबत नेले असल्याचे येतील स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. येथील लष्करी अधिका-यांनी या घटनेबाबत कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. बोको हराम ही संघटना अल- कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधीत असून ती २००२ साली स्थापन करण्यात आली. सन २००९ पासून तिच्या कारवायांना वेग आला आहे. या संघटनेच्या कारवाया रोखण्यास नायजेरीयाच्या लष्काराला अपयश येत असल्याचे स्थानिक नागरीकांचे म्हणणे आहे. तसेच घटना घडल्या नंतर ब-याच उशिराने लष्कर घटनास्थळी दाखल होत असल्याचेही स्थानिक नागरिकांनी सांगितेल आहे.
बोको हरामने केले पुन्हा २० महिलांचे अपहरण
By admin | Published: June 10, 2014 5:28 PM