Ukrainian Bomb Mystery: रशिया आणि यूक्रेनमध्ये अजूनही युद्ध सुरू आहे. अशात या युद्धासंबंधी एक अशी घटना समोर आली आहे, ज्याबाबत डॉक्टरही हैराण झाले. इथे डॉक्टरांनी ऑपरेशन करून एका रशियन सैनिकाच्या छातीतून जिवंत बॉम्ब काढला. पण डॉक्टरांना हे समजू शकलं नाही की, हा बॉम्ब सैनिकाच्या छातीत हृदयाजवळ पोहोचला कसा आणि त्याचा स्फोट का झाला नाही?
सैनिकाच्या छातीत जिवंत बॉम्ब
डेली स्टारमधील एका रिपोर्टनुसार, या रशियन सैनिकाचं नाव निकोले पासेन्को आहे. तो यूक्रेनी सैनिकांसोबत लढत होता. यादरम्यान तो गंभीर जखमी झाला. जेव्हा या सैनिकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तेव्हा ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांना त्याच्या छातीत जिवंत बॉम्ब आढळून आला. ना सैनिकाला ना डॉक्टरांना हे माहीत आहे की, हा बॉम्ब त्याच्या छातीत गेला कसा?
गुरूवारी रशियन रक्षा मंत्रालयाने या घटनेला दुजोरा दिला. TASS या रशियन न्यूज एजन्सीने खुलासा केला की, सैनिकावर उपचार सेंट्रल मिलिट्री क्लिनिकल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केले. एक प्रवक्ताने सांगितलं की, सैनिकाच्या छातीत घाव होता, ज्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. नंतर समजलं की, एका बॉम्ब स्फोट न होता त्याच्या छातीत घुसला होता.
प्रवक्त्याने सांगितलं की, ऑपरेशन दरम्यान स्फोट होण्याचा धोका होता. पण डॉक्टरांनी फार सावधानतेने जखमी सैनिकाच्या छातीतून बॉम्ब बाहेर काढला. डॉक्टरांना मोठं यश मिळालं.