मोगादिशू : सोमालियाच्या बेदोआ शहरात बॉम्बस्फोटात ३० जण ठार, तर ६१ जण जखमी झाले आहेत. गव्हर्नर अब्दुराशिद अब्दुलाही यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. दरम्यान, अलकायदासमर्थित शबाबने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.मिळालेल्या माहितीनुसार जखमींपैकी १५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. राजधानी मोगादिशूच्या एका गजबजलेल्या रेस्टॉरंटमध्ये एक बॉम्बस्फोट झाला. यानंतर येथील नागरिक पळाले. याच दरम्यान आणखी एक आत्मघातकी स्फोट झाला. बेदोआतील एक पोलीस अधिकारी अब्दिरहमान इब्राहीम यांनी सांगितले की, या भागातील वर्दळीच्या आणि गजबजलेल्या भागात हा स्फोट झाला. अन्य एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले की, सलग दोन स्फोट झाले. एक कार बॉम्बहल्ला तर दुसरा आत्मघातकी स्फोट होता. (वृत्तसंस्था)