ऑनलाइन लोकमत
रिओ डी जेनेरियो, दि. 12- ब्राझीलमधील एका कुटुंबात सगळ्यांनाच आश्चर्यचकीत करणारी घटना घडली आहे. तेथिल फ्रँकिएलेन दे सिल्वा झाम्पोली पजिल्या या गर्भवती ब्रेन डेड महिलेने 123 दिवसांनी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. 9 आठवड्यांची गर्भवती असताना फ्रँकिएलेनचा मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ब्रेनहॅमरेजमुळे मृत्यू झाला होता. पण तिच्या गर्भातील बाळांच्या हृदयाचे ठोके सुरु असल्याचं डॉक्टरांना निदर्शनास आलं होतं. फ्रँकिएलेन ब्रेन डेड होती, पण तिच्या शरीरात जुळ्या बाळांचं पालनपोषण सुरूच होतं. डॉक्टरांनी तिला ब्रेनहॅमरेजनंतर लाइफ सपोर्टिंग सिस्टमवर ठेवलं होतं. मुलांच्या जन्मानंतर ते सिस्टम काढून टाकण्यात आलं आणि फ्रँकिएलेनला अखेरचा निरोप देण्यात आला. दोन बाळांच्या येण्याचा आनंद साजरा करायचा की त्यांच्या आईच्या जाण्याचं दुःख व्यक्त करायचं, अशी द्विधा मनस्थितीत त्या कुटुंबियांची झाली असावी. या ब्रेन डेडे आईच्या पोटी एका मुलाने आणि मुलीने जन्म घेतला आहे. अॅना व्हिक्टोरीया आणि असफ अशी या मुलांची नावं ठेवण्यात आली आहे.
123 दिवसांनंतर म्हणजेच सातव्या महिन्यात सीझेरियन केल्यानंतर फ्रँकिएलेनने जुळ्या मुलांना जन्म दिला. ज्यामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांना तीन महिने इक्युबेटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. आता ही जुळी मुलं वडील म्युरिएल पजिल्या आणि आजी ऍअँजेला सिल्वा यांच्यासोबत राहतात.
आणखी वाचा
प्यारवाली लव्ह स्टोरी; ब्रिटनमध्ये मुस्लीम तरूणाने केला समलैंगिक विवाह
कतरिना कैफ म्हणते रणबीरसोबतचे "ते" नाते अजूनही चांगलंच
देसी गर्ल करणार हॉलिवूड चित्रपटाची निर्मिती
"आई ब्रेन डेड झाल्यामुळे गर्भाशयात असलेली मुलं जगतील की नाही याची शाश्वती नव्हती. पण अल्ट्रासाऊंड केल्यानंतर दोन्ही भ्रूण जिवंत असल्याचं पाहिलं, त्यांच्या ह्रदयाचे ठोके ऐकले आणि आम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला. फ्रँकिएलेनचे सर्व अवयव व्यवस्थित आणि सुरळीत काम करत होते. त्यामुळे तिच्या गर्भाशयातील न जन्मलेल्या मुलांना वाचवण्यासाठी तिला जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वाढीवर आमचं कायमच लक्ष असायचं, असं डॉक्टर डॉल्टन रिवाबेम यांनी सांगितलं.
दरम्यान, मला माझ्या मुलीचा अभिमान आहे. तिला गमावणं फार कठीण होतं, पण ती एखाद्या योद्ध्याप्रमाणे आपल्या मुलांचं रक्षण केलं, असं फ्रँकिएलेनची आई अँजेला यांनी सांगितलं आहे.