कॅलिफोर्निया : प्राणीप्रेमी कोणत्याही प्राण्याला त्रास होऊ देत नाहीत. त्यांच्यासमोर एखादं लहानसं पिल्लू आलं तरीही ते त्यांच्याकडे आदराने आणि प्रेमाने पाहतात. त्यांच्याशी आपुलकीने वागतात. त्यांना आपल्या लहान मुलांप्रमाणेच वागतात. एखादा प्राणी जर आगीत अडकला असेल तर आपला जीव धोक्यात घालून त्याला सुखरूप बाहेर काढला नाही तर मग नवलच. तुम्ही जर प्राणीप्रेमी असाल तर तुम्हाला तर हे नक्कीच पटेल. पण तुम्ही जर प्राणीप्रेमी नसाल तर तुम्हाला हे सारं अतिशयोक्ती वाटेल. पण हे खरं ठरलंय कॅलिफोर्नियामध्ये.
याहू डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण कॅलिफोर्नियातील जंगलात अचानक वणवे पेटतात. त्यामुळे येथील नागरिक नेहमीच टांगत्या तलवारीखालीच जगत आहेत. इकडचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. नुसताच व्हायरल होत नसून अनेकांनी या व्हिडिओला बरीच पसंती दिली आहे. यामागचं कारणही अगदी तसंच आहे.
एका जंगलात लागलेल्या वणव्यात एक सशाचं छोटंसं पिल्लू अडकलं होतं. अडकलेल्या पिल्लाला पाहून एका तरुणाला वाईट वाटलं. हा व्हिडिओ पाहून त्याचा त्रास आपण अनभवू शकतो. या वणव्यापासून या सशाला वाचवलं पाहिजे याकरता तो तरुण प्रयत्न करतो. आगीच्या ज्वाळा भडकत असताना आपल्या जीवाची तमा न बाळगता या तरुणाने सशाला पकडण्यासाठी प्रयत्न केले.
वणवा पेटला असताना मनुष्य काही फुटांवरही उभं राहू शकत नाही, कारण या वणव्याच्या ज्वाळा दूरवर पसरत असतात. पण तरीही एका जिद्दी प्राणीमित्रानं कसलाही विचार न करता आपल्या प्राणाची बाजी लावून सशाच्या पिल्लाला वाचवलं. हा सगळा प्रकार तिकडे उपस्थित असलेल्या लोकांनी व्हिडिओत कैद केला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबाबत तेथील स्थानिक माध्यमांनी संपर्क साधला असता त्यांच्याकडे काही ठोस माहिती उपलब्ध नसल्याचे समजले. पण या अज्ञात तरुणाविषयी जाणून घ्यायची अनेक नेटीझन्सची इच्छा आहे.
आणखी वाचा - नवरदेव हत्तीवर तर वऱ्हाडी घोडे अन् उंटावर; पुण्यातील अनोखा विवाहसोहळा...
हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच क्षणार्धात व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून या जिगरबाज तरुणाचं आता जगभर कौतुक होतंय. ज्याप्रमाणे माणसाचं जीव मोलाचे असतात, त्याचप्रमाणे मुक्या प्राण्यांचेही जीव मोलाचे असतात. त्यांना बोलता येत नसलं तरीही त्यांनाही वेदना असतात. त्यामुळे त्यांना या आगीच्या ज्वाळाच्या वेदनातून बाहेर काढण्यासाठी एका तरुणाने चक्क वणव्यातच उडी घेतली. हा सगळा प्रकार आता सोशल मीडियावर कौतुकास पात्र ठरला आहे.
आणखी वाचा - आपल्या पिल्लाला खड्ड्यातून बाहेर काढल्यानंतर हत्तींनी व्यक्त केली कृतज्ञता