शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

गर्लफ्रेन्डसोबत टायटॅनिक पोज देत होता तरूण, पाय घसरला अन् दोघेही पडले समुद्रात आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 12:11 PM

Titanic Pose Incident In Turkey: लोक समुद्राची सफारी करतात तेव्हा अशी पोज देऊन फोटो काढतातच. असंच काहीसं तुर्कीमधील एका कपलने करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यासोबत फारच वाईट घडलं.

Titanic Pose Incident In Turkey: ज्यांनी ज्यांनी 'टायटॅनिक' सिनेमा पाहिला त्यांना त्यातील जहाजावरही जॅक आणि रोजची आयकॉनिक पोज चांगलीच लक्षात असेल. अनेकजण अशी पोज देऊन आजही फोटो काढतात. लोक समुद्राची सफारी करतात तेव्हा अशी पोज देऊन फोटो काढतातच. असंच काहीसं तुर्कीमधील एका कपलने करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यासोबत फारच वाईट घडलं.

एका दु:खद घटनेत कोकेलीच्या उत्तर-पश्चिम प्रांतात टायटॅनिक पोज देण्याची प्रयत्न करणाऱ्या कपलचं संतुलन बिघडलं आणि ते समुद्रात जाऊन पडले. या घटनेत पुरूषाचा जीव गेला. तर महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. २३ वर्षीय फुरकान सिफ्त्सी आणि त्याची गर्लफ्रेन्ड माइन दिनार १६ मे रोजी रात्री उशीरा मरीना पोर्टवर मासे पकडत होते. थोड्या वेळाने कपल समुद्र किनारी टायटॅनिकची पोज देण्यासाठी सिक्युरिटी बॅरिअरवर चढले.

तुम्हाला आठवत असेल की, हॉलिवूड सिनेमा टायटॅनिकमध्ये अभिनेता लिओनार्डो दीकॅप्रिओ आणि केट विंसलेट टायटॅनिक जहाजाच्या सेलवर सनसेट दरम्यान एका पोज देत उभे राहतात. माइन दीनारने हॉस्पिटलमध्ये दिलेल्या आपल्या जबाबात सांगितलं की, 'आम्ही ड्रिंक घेतलं होतं आणि मग टायटॅनिक पोज देण्याचा प्रयत्न केला. पण आमचं संतुलन बिघडलं आणि आम्ही समुद्रात पडलो'.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला मासे पकडण्याच्या काठीने खेचून बाहेर काढलं. दीनारला बाहेर काढल्यावर अॅम्बूलन्सने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. दीड तासाच्या शोधानंतर सुरक्षा युनिटला फुरकान सिफ्त्सीचा मृतदेह सापडला. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके