चीनच्या सर्वोच्च गुप्तचर संस्थेने चीनच्या विद्यार्थ्यांना देखण्या स्त्रिया आणि रुबाबदार मुलांपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. चीनने आपल्या विद्यार्थ्यांना संवेदनशील डेटामध्ये प्रवेश करताना अधिक सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. गुप्तहेर संस्थेने विद्यार्थ्यांना परदेशी लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. ते खोट्या भावनांनी हेरगिरी करण्याचा प्रयत्न करु शकतात, त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते. चीनच्या सुरक्षा मंत्रालयाने WeChat सोशल मीडिया अकाउंटवर याबाबत एक मोठी सूचना प्रसिद्ध केली आहे.
सावधान! चहा प्यायल्याने खरंच कोलेस्ट्रॉल वाढतं का?; जाणून घ्या, काय असू शकतो धोका?
चीनच्या सुरक्षा मंत्रालयाने याबाबत इशारा दिला. यात म्हटले आहे की, विविध माध्यमांद्वारे संवेदनशील माहिती उघड करण्यासाठी विद्यार्थ्यांना फसवले जाऊ शकते. विदेशी हेर आणि गुप्तचर संस्था तरुणांना आणि विद्यार्थ्यांना लक्ष्य करत आहेत. विद्यार्थ्यांचा वापर करण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत, असंही यात म्हटले आहे.
हे विदेशी एजंट अनेकदा विद्यापीठाचे विद्वान, संशोधन संस्थांचे कर्मचारी किंवा सल्लागार कंपन्या असल्याची स्वत:ची ओळख निर्माण करतात. ज्यांच्याकडे गोपनीय आणि संवेदनशील वैज्ञानिक संशोधन डेटाचा प्रवेश आहे अशा विद्यार्थ्यांचा ते विश्वास संपादन करतात. ते मार्केट रिसर्च किंवा शैक्षणिक देवाणघेवाणीच्या नावाखाली उच्च पगाराच्या अल्प-मुदतीच्या संधी असलेल्या विद्यार्थ्यांना आमिष दाखवतात. एकदा विद्यार्थ्यांनी विश्वास दाखविल्यानंतर, परदेशी गुप्तचर संस्था सोशल मीडिया, टेलिफोन किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तथाकथित विनामूल्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करतात.
सुंदर मुली आणि रुबाबदार पुरुषांसारखे असतात, ते तरुण विद्यार्थ्यांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, असंही चीनने म्हटले आहे. चीनच्या राष्ट्रीय सुरक्षेला जाणवणाऱ्या धोक्यांवर सरकारने हे इशारे दिले आहेत.
कारण काय?
विद्यार्थी आणि विद्यार्थींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून देशातील महत्वाची माहिती मिळवतील. यामुळे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका होऊ शकतो. यामुळे चीन सरकारने विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना इशारा दिला आहे.