शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

आॅलिव्ह आॅइलमध्ये मेंदूच्या कॅन्सरला आळा घालण्याची शक्ती!

By admin | Published: June 06, 2017 5:14 PM

शास्त्रज्ञ करताहेत अधिक संशोधन..

- मयूर पठाडेकॅन्सरनं सध्या सगळ्या जगातच धुमाकूळ घातला आहे. वेगवेगळ्या कॅन्सरनं मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांची संख्याही जगभरात खूपच मोठी आहे. भारतातही या विकाराचं प्रमाण खूपच मोठं आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेनं यावर वेळोवेळी चिंताही व्यक्त केली आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक तंबाकूविरोधी दिनीही तज्ञांनी याबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि त्यासाठी आपल्या लाइफस्टाइलमध्ये सुधारणा करण्याचा सल्ला दिला होता. जगभरात त्याविषयी जनजागृती सुरू आहे आणि त्याबाबतच्या उपाययोजनांसाठीही प्रयत्न सुरू आहेत. याबद्दलचा एक प्रयत्न नुकताच ब्रिटनच्या एडिनबर्ग युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केला. आॅलिव्ह आॅईलमुळे मेंदूच्या कॅन्सरला आळा बसू शकतो असा त्यांच्या संशोधनाचा निष्कर्ष आहे.

 

खरं तर हा शोध ‘अपघातानं’ लागला असंच म्हणावं लागेल, कारण संशोधक अभ्यास करीत होते तो ओलिक अ‍ॅसिडवर. ओलिक अ‍ॅसिड हे एक फॅटी अ‍ॅसिड असून अ‍ॅनिमल आणि व्हेजिटेबल फॅट्समध्ये तसेच वेगवेगळ्या तेलांमध्ये ते निसर्गत:च आढळून येतं. बाजारात मिळू शकणारं हे अ‍ॅसिड पिवळसर रंगाचं असलं तरी मुळात ते रंगहीन आणि वासहीन आहे. हे आॅलिक अ‍ॅसिड आपल्याला आॅलिव्ह आॅईलमध्येही आढळून येतं.

 

आपल्या पेशींतील कॅन्सरच्या वाढीसाठी उपयुक्त ठरू शकणारे जिन्स प्रभावहीन करण्याचं काम आॅलिव्ह आॅइल करू शकतं असं शास्त्रज्ञांना आपल्या अभ्यासात आढळून आलं. संशोधकांनी केलेला हा अभ्यास ‘मॉलिक्यूलर बायॉलॉजी’ या जगप्रसिद्ध मासिकात प्रसिद्धही झाला आहे. असं असलं तरी यावर आणखी संशोधन बाकी आहे आणि शास्त्रज्ञ त्या तयारीला लागले आहेत.

 

प्रत्यक्ष मानवावर, मानवाच्या मेंदूवर आॅलिव्ह आॅइलचा काय परिणाम होतो, प्रत्यक्ष खाण्यात जर आॅलिव्ह आॅइलचा समावेश केला तर मेंदूचा कॅन्सर त्यामुळे आटोक्यात येईल का याबाबतचा प्रयोग मात्र प्रत्यक्ष मानवावर शास्त्रज्ञांनी करून पाहिलेला नाही. त्यांनी फक्त प्रयोगशाळेतच याच्या चाचण्या घेतल्या आहेत आणि त्या सकारात्मक आल्या आहेत. अधिक संशोधनानंतर या बाबी पुरेशा स्पष्ट होतील असं संशोधकांचं म्हणणं आहे.