ब्रासिलिया : ईशान्य ब्राझीलमधील सर्जीप राज्यात तुरुंगात कैद्यांनी १२० जणांना ओलिस ठेवले असून, ओलिसात बहुतांश कैद्यांना भेटण्यासाठी आलेले नातेवाईक आहेत, तसेच चार रखवालदार आहेत. तुरुंगाच्या प्रवक्त्या सँड्रा मिलो यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्साजू शहरातील अवागडो जसिंतो फिलो तुरुंगात ही घटना घडली. तुरुंगाच्या एका भागात हे नाट्य चालू असून, दुसरा भाग शांत आहे. ओलिस ठेवलेल्या लोकांच्या सुटकेसाठी पोलीस बोलावण्यात आले आहेत. कैदी आपल्या नातेवाईकांना जखमी करणार नाहीत; पण रखवालदारांची मात्र चिंता आहे, असे मिलो म्हणाल्या. ५ लाख ४८ हजार कैदी आहेत. तुरुंगात गर्दी होऊ नये म्हणून २ लाख ७ हजार जणांना इतरत्र हलविण्याची गरज आहे. ब्राझीलमध्ये वर्ल्ड कप फूटबॉलचे सामने सुरू होण्यास २६ दिवस बाकी असताना ही दंगल झाली आहे. (वृत्तसंस्था)
ब्राझील : कैद्यांकडून १२० जण ओलिस
By admin | Published: May 19, 2014 3:45 AM