शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

बापरे! बूटात पाय घालताच ७ वर्षीय मुलगा वेदनेने किंचाळू लागला, तडफडत जीव गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 5:16 PM

लुइजची अवस्था पाहून ४४ वर्षीय आई एंजेलिता घाबरली होती. लुइज लाल पडू लागला.

बूटात पाय घालताच ७ वर्षीय मुलगा वेदनेने किंचाळू लागला. गोंधळात त्याच्या घरच्यांनी रुग्णालयात नेले. मात्र त्याच्या तब्येतीत बिघाड होतच गेला. हॉस्पिटलमध्येच मुलाला एका पाठोपाठ एक ७ वेळा हार्ट अटॅक आला आणि अखेर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मुलाच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला. ब्राझीलच्या या घटनेने सोशल मीडियात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ब्राझीलच्या साओ पाऊलो शहरातील ही घटना आहे. २३ ऑक्टोबरला ७ वर्षीय लुइज मिगुएल त्याच्या कुटुंबासोबत बाहेर जाण्याची तयारी करत होता. परंतु जसा त्याने बूटात पाय घातला तसा त्याने कुणीतरी चावल्याचा भास झाला. लुइज मोठ्या वेदनेने किंचाळत तडफडू लागला. लुइजसोबत काय घडले हे घरच्यांना कळालंच नाही. मात्र त्याच्या वेदनेने घरातील सगळेच भयभीत झाले होते. 

लुइजची अवस्था पाहून ४४ वर्षीय आई एंजेलिता घाबरली होती. लुइज लाल पडू लागला. एंजेलितानं आसपास पाहिले परंतु काहीच दिसले नाही. परंतु जेव्हा आईनं बूट पाहिले तेव्हा त्याच विषारी विंचू पाहून शॉक बसला. जगातील सर्वात विषारी विंचू ब्राजीलियन येलो स्कॉर्पियन त्याच्या बूटात होता. या विंचूला Tityus Serrulatus असंही म्हणतात. सर्वात विषारी विंचू असल्याने तो चावल्यास जीवही जाऊ शकतो. लुइजला तडफडताना पाहून घरच्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्याच्यावर उपचार झाले तेव्हा काही वेळाने तो बरा होईल अशी शक्यता निर्माण झाली. परंतु लुइजला त्यानंतर एका पाठोपाठ एक ७ वेळा हार्ट अटॅक आले आणि २५ ऑक्टोबरला त्याचा दुर्दैवी अंत झाला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"