जीममध्ये घाम गाळून बॉ़डी बनवणं सध्याच्या काळात फॅशन बनली आहे. आजुबाजुला अशी अनेक लोकं दिसतात ज्यांनी मसल्स आणि बायसेप्स वाढवण्यासाठी फक्त जीम लावलेली असते. तर काही जण असे असतात जे लवकरात लवकर रिझल्ट मिळावा म्हणून नानाविध प्रकारांचा वापर देखील करतात, ज्यामध्ये स्टेरॉईड आणि इंजेक्शनचा समावेश असतो. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. ब्राझीलच्या एका बॉडीबिल्डर आणि टिकटॉकस्टार वाल्दिर सेगातो याने मसल्स वाढवण्यासाठी जे काही केलं. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.
हल्क या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ब्राझीलियन व्यक्तीने 23 इंचाचे बायसेप्स बनवण्यासाठी स्वत:ला एक खतकनाक तेलाचं इंजेक्शन दिलं. ज्यामुळे त्याचा वाढदिवशीच मृत्यू झाला आहे. स्ट्रोक आणि इंफेक्शनचा धोका असतानाही बायसेप्स आणि बॅक मसल्स वाढवण्यासाठी वाल्दिर सेगातो खूप दिवसांपासून सिंथॉल इंजेक्शनचा वापर करत होता. डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, वाल्दिरने 2016 मध्ये मला सर्व लोक हल्क आणि हि-मॅन असं म्हणतात आणि मला ते ऐकायलाही आवडतं असं म्हटलं होतं.
सहा वर्षांआधी वाल्दिरला डॉक्टरांनी सतर्क केलं होतं. अशाप्रकारे बॉ़डी बनवण्यासाठी इंजेक्शन घेतलं तर नर्वस डॅमेजसह अनेक जीवघेण्या समस्यांचा सामना करावा लागेल असं म्हटलं होतं. तरी देखील वाल्दिर मसल्स वाढवण्यासाठी सातत्याने इंजेक्शनचा वापर करत होताच. इंजेक्शनचा वापर करत असल्यानेच त्याचे मसल्स हे 23 इंचाचे झाले. ज्यामुळे लोक त्याला द मॉन्स्टर म्हणू लागले होते.
वाल्दिर सोशल मीडियावर आपल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे शेअर करत असे. तसेच तो स्वत:ला वाल्दिर सिंथॉल म्हणायचा. टिकटॉकवर त्याचे 1.7 मिलीयन फॉलोअर्स आहेत. एका स्थानिक व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूच्या दिवशी त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे त्याने मदतीसाठी आपल्या आईला देखील बोलवलं होतं. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याचा मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.