अमेरिकेतील कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयड याचा पोलिसांच्या अत्याचारामुळे मृत्यू झाल्यानंतर जगभरात Black Lives Matter नावाने आंदोलन सुरू झालं आणि कृष्णवर्णीय लोकांविरोधात पोलिसांच्या क्रूरतेचा वाद पेटला. आता अशीच एक धक्कादायक घटना ब्राझीलमधून समोर आली आहे. इथे पोलील एका कृष्णवर्णीय महिलेसोबत क्रूर वागणूक करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत महिला रस्त्यावर पडून आहे आणि पोलीस महिलेच्या मानेवर पाय देऊ उभा होतांना दिसतो आहे.
CNN नुसार, महिलेचं वय ५१ वर्षे आहे आणि ती ५ मुलांची आई सुद्धा आहे. पोलीसाच्या या अत्याचारामुळे महिलेच्या मानेचं हाड मोडलं आहे आणि तिला १६ टाकेही पडले आहेत. ही घटना ब्राझीलचं शहर साओ पाउलोतील असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच त्या पोलिसाला सस्पेंड केलंय. गव्हर्नर जोआओ डोरिया म्हणाले की, अशाप्रकारच्या घटना अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत. आता शहरातील २ हजार पोलिसांना बॉडीवर कॅमेरा लावण्याचा आदेश दिला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील मिनेपोलिस शहरात पोलिसांनी २५ मे रोजी जॉर्ज फ्लॉयडसोबतही असाच अत्याचार केला होता. एका व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात पोलीस अधिकारी डेरेक चॉवेन हा जॉर्जच्या मानेवर गुडघा ठेवून ८ मिनिटे ४६ सेंकद उभा होता.
याने जॉर्जला श्वास घेता येत नव्हता आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर जगभरात आंदोलने झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंदोलन करणाऱ्यांना आतंकवादी म्हटलं. त्यानंतर व्हाईट हाऊस बाहेर मोठा हिसाचार भडकला होता. इथे सेना तैनात करावी लागली होती.