अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये रविवारी अंधाधुंद गोळीबाराची घटना घडली. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. रिपोर्टनुसार, मॉन्टेरी पार्क परिसरात चिनी नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान रात्री १० च्या सुमारास गोळीबार झाला. काही रिपोर्ट्सुनार यात किमान १० जणांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबाराची ही घटना रात्री १० नंतर घडली. लॉस एंजेलिस टाईम्सच्या वृत्तानुसार, मॉन्टेरी पार्कमध्ये चिनी नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान ही गोळीबारीची घटना घडली. घटना घडली त्यावेळी या ठिकाणी हजारो लोकांची गर्दी झाली होती. हे पार्क लॉस एंजेलिस डाउनटाउनपासून सुमारे ११ किमी अंतरावर आहे.
आठवड्याभरातील दुसरी घटनाघटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी हजेरी लावली. विशेष म्हणजे अमेरिकेत गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या सोमवारी कॅलिफोर्निया शहरातच एका घरात गोळीबार झाला होता. यादरम्यान आई आणि मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला पोलिसांनी टार्गेट किलिंग असे नाव दिले आहे.
… म्हणून समजलं नाहीघटनेच्या वेळी खूप मोठ्या आवाजात गाणी वाजत होती, त्यामुळे बराच वेळ फटाके वाजवले जात होते की गोळीबार हे समजू शकले नाही. काही वेळाने जखमी लोक धावताना दिसले, त्यानंतर सत्य समोर आले, असे वृत्त 'स्काय न्यूज'ने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.