नवी दिल्ली - भारतीय अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांना यावर्षीचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ईस्टर डुफलो आणि मायकल क्रेमर या दोन अर्थशास्त्रज्ञांसह अभिजित बॅनर्जी यांना संयुक्तरीत्या हा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी भारतीय अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला होता.
जागतिक पातळीवर दारिद्य्र दूर करण्यासाठी या अर्थशास्त्रज्ञांनी अवलंबलेल्या प्रायोगिक दृष्टीकोनासाठी त्यांना यावर्षीचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे, असे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे. विख्यात शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो.
रविंद्रनाथ टागोर, सी. व्ही. रमन, मदर टेरेसा, अमर्त्य सेन आणि कैलास सत्यार्थी यांच्यानंतर नोबेल पुरस्कार जिंकणारे अभिजित बॅनर्जी हे सहावे भारतीय ठरले आहेत.
मृत्यूच्या खोट्या, नकारात्मक बातमीने रचला होता नोबेल पुरस्काराचा पाया
जगातील सर्वोच्च पुरस्कार असलेला नोबेल हा जरी विविध क्षेत्रातील सकारात्मक योगदानासाठी देण्यात येत असला तरीही या पुरस्कारची सुरुवात मात्र एका नकारात्मक बातमीमुळे झाली होती. स्वीडनचे थोर शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूची ही बातमी होती. या खोट्या बातमीमुळे अल्फ्रेड नोबेल यांना एवढा मोठा धक्का बसला की त्यांनी आपल्या कमाईचा सर्वात मोठा भाग चांगल्या लोकांचा सन्मान करण्यासाठी देऊन टाकला.नोबेल फाऊंडेशनद्वारे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शांती, साहित्य, भौतिकी, रसायन, संशोधन आणि अर्थशास्त्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी दिला जातो.
घटना 1888 मधील आहे जेव्हा अल्फ्रेड नोबेल हे त्यांनी लावलेल्या शोधांमुळे चर्चेत होते. त्यांनी एकूण 355 शोध लावले. मात्र, 1867 मध्ये त्यांनी लावलेल्या डायनामाईटच्या शोधाने अख्ख्या जगाला हादरवून सोडले. यानंतर 1988 मध्ये एका वृत्तपत्राने त्यांच्या या डायनामाईटच्या शोधावर टीका करत मृत्यूच्या सौदागराचा मृत्यू या मथळ्याखाली बातमी दिली. या नंतर जगही त्यांना याच नावाने ओळखायला लागले. या बातमीवरून नोबेल यांना एवढा मोठा धक्का बसला की त्यांना त्यांच्या मृत्यूनंतरही जग याच नजरेने पाहील याची भीती वाटू लागली. यानंतर त्यांनी 27 नोव्हेंबर, 1895 मध्ये मृत्यूपत्र तयार केले आणि त्यांच्या संपत्तीचा एक मोठा हिस्स्याची त्यांनी ट्रस्ट बनवून टाकली. या रकमेतून मानव जातीसाठी चांगले काम करणाऱ्या लोकांना सत्कार केला जावा अशी त्यांची इच्छा होती.
नोबेल यांचे योगदान काय?नोबेल हे 18 वर्षांचे असताना त्यांना रसायनशास्त्रातून पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला पाठविण्यात आले. त्यांनी त्यांच्या आयुष्यात एकूण 355 शोध लावले. मात्र, त्यांचा 1867 मधील डायनामाइटचा शोध त्यांना प्रचंड पैसा देऊन गेला. 3 सप्टेंबरला 1864 मध्ये त्यांच्या वडीलांच्या कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटात संपूर्ण कारखाना नष्ट झाला आणि त्यांच्या छोट्या भावाचाही मृत्यू झाला. या घटनेत आणखी 4 जणांना प्राण गमवावे लागले होते.
स्वत:च केली पुरस्कार वितरणाची सुरुवातनोबेल यांनी स्वत:च 1901 मध्ये पुरस्कार वितरण केले. पहिला नोबेल शांती पुरस्कार रेड क्रॉसचे संस्थापक हॅरी दुनांत आणि शांतीचे प्रणेते फ्रेडरिक पैसी यांना प्रदान करण्यात आला. यानंतर नोबेल पुरस्कारासाठी ट्रस्टद्वारे नावाची घोषणा आणि अल्फ्रेड नोबेल यांच्या 10 डिसेंबर या पुण्यतिथीला पुरस्कार प्रदान करण्यात येऊ लागले.