लंडन : स्तनाच्या कर्करोगाबाबत असे मानले जाते की, हा आजार केवळ महिलांना होतो. ब्रिटनमधील एक कुटुंब मात्र याला अपवाद आहे. कूपर कुटुंबातील दोन पुरुषांचा स्तनाच्या कर्करोगाने मृत्यू झाला असून, या रोगाची लागण झालेले जॉयल्स कूपर हे या कुटुंबातील तिसरे पुरुष आहेत. आधी वडील आणि त्यापाठोपाठ चुलत्याचा मृत्यू झाल्यानंतर जॉयल्स यांना आपल्या छातीतील गाठीचा छडा लागला. उपचारादरम्यान जाईल्स यांची दोनवेळा मॅस्टेक्टॉमी करून ही गाठ काढून टाकण्यात आली. जाईल्स यांना आजही छातीवरील शस्त्रक्रियेचे व्रण दाखविताना भीती वाटते. शस्त्रक्रियेच्या अनुभवाबाबत बोलताना जॉयल्स म्हणाले की, तो अनुभव भीतीदायक होता. भूल देण्यापूर्वी डॉक्टर मला म्हणाले की, २० वर्षांत पहिल्यांदाच स्तनाचा कर्करोग झालेल्याला झोपवत आहे. माझ्यासाठी ही धोक्याची घंटा होती. दरवर्षी पुरुषांना स्तनाचा कर्करोग झाल्याची ४०० प्रकरणे समोर येतात तर महिलांची संख्या ५५ हजारांच्या जवळ असते. जॉयल्स यांनी ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट गु्रपचा आधार घेतला आहे. सपोर्ट ग्रुपकडून मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सपोर्ट ग्रुपमधील सदस्यांच्या पहिल्या भेटीचा अनुभव सांगताना ते म्हणाले की, तेथे खोलीत १२ लोक होते. सर्व जण खूपच प्रेमळ होते. मात्र, त्या सर्व महिला होत्या. तेथे मी एकटाच पुरूष होतो. मी दोन वर्षांपासून स्तनाच्या कर्करोगाने पीडित आहे. मात्र, हा आजार असलेला दुसरा एकही पुरुष मला आजपर्यंत भेटला नाही.
एकाच कुटुंबातील तिसऱ्या पुरुषाला स्तनाचा कर्करोग
By admin | Published: February 09, 2017 1:52 AM