शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!
2
लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार
3
Team India Arrival LIVE: मुंबईकरांचे स्पिरीट! प्रचंड गर्दीतही अँम्ब्युलन्सला करून दिली वाट
4
“शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात मविआ सरकार अन् राष्ट्रवादी...”; रोहित पाटलांचे सूचक विधान
5
हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री, तुरुंगातून सुटल्यानंतर घेतली CM पदाची शपथ
6
"...तर आपण सर्व नामशेष होऊ"! इस्रो प्रमुख सोमनाथ यांचा पृथ्वीवासीयांना मोठा इशारा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला जाणार, परराष्ट्र मंत्रालयाने तारीख सांगितली
8
"गुजरातच्या बसला पार्किंगसाठी जागा देऊ, पण भारतीय संघाची 'बेस्ट' मधूनच मिरवणूक काढा"
9
Jio आणि Airtel नंतर आता Vi चे प्लॅन महागले; जाणून घ्या नवीन किमती...
10
Victory Parade : Team India च्या विमानाला असाही 'सॅल्युट'! अनोख्या घटनेने वेधले सर्वांचे लक्ष
11
टोमॅटो पुन्हा २०० पार जाण्याची शक्यता; मुंबई, देशभरातील आत्ताचे दर काय...
12
विश्वविजेत्या टीम इंडियाला भेटल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली युझवेंद्र चहलची खास विचारणा, म्हणाले, ‘’हाच का तो…’’
13
राहुल गांधींनी हाती घेतले फावडे अन् कामगारांसोबत थापीही फिरवली!
14
इंडिया का राजा, रोहित शर्मा...! वानखेडेवर हिटमॅनचा जलवा; चाहत्यांचा एकच जल्लोष, Video
15
'T20 वर्ल्ड चॅम्पियन्स'च्या कुटुंबीयांना भेटले PM मोदी; BCCIकडून पंतप्रधानांना स्पेशल 'जर्सी'!
16
ब्रिटनमध्ये ऋषी सुनक दारुण पराभवाच्या छायेत? सर्व्हे आला, आज मतदानाला सुरुवात
17
“कंपन्यांकडून लूट, पीकविम्याचे धोरण बदलून शेतकरी हिताचे करा, शिंदे सरकार...”: नाना पटोले
18
धीरेंद्र शास्त्रींचा जन्मोत्सव; शुभेच्छा देण्यासाठी बागेश्वर धाममध्ये लाखो भाविकांची गर्दी
19
अंबादास दानवेंना दिलासा, उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाबाबत महत्त्वाचा निर्णय
20
सेन्सेक्स पहिल्यांदा 80,000 पार; BSE मार्केट कॅप 447.43 लाख कोटींच्या पुढे...

आमरस पुरी, विंदांची पणती, दादा कोंडके अन् ‘स्कोअर काय?’; संमेलनाची झोकात सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 7:28 AM

सिलिकॉन व्हॅलीत मराठी स्मरणरंजनाची धमाल, भेटीगाठी-खाण्यापिण्याची लयलूट

थेट अमेरिकेतून अपर्णा वेलणकर

सान होजे कन्व्हेन्शन सेंटर नावाच्या अती-विस्तीर्ण वास्तूमध्ये एकीकडे ज्येष्ठ नागरिकांसाठीचा ‘उत्तररंग’ रंगला आहे..  दुसरीकडे बी कनेक्ट मध्ये उद्योजकता विकास आणि स्टार्टअप पिचिंगची सत्रे सुरु आहेत .. एकांकिकांच्या स्पर्धा ऐन भरात आहेत.. ढोलताशा आणि मल्लखांब टीमच्या रिहर्सल्सना   जोर आला आहे... अमेरिकेतील मराठी शाळांच्या धमाल वर्गात महेशकाका (काळे)सोबत मुलांचा चिवचिवाट सुरु आहे..

दुपारी आमरस -पुरीचे जेवण जेवत असताना ज्याच्या नजरेसमोर मोबाईलचा स्क्रीन त्याला जो तो विचारतोय “स्कोअर काय झाला?”... हे बृहन्महाराष्ट्रमंडळाच्या सान होजे अधिवेशनातले पहिल्या दिवसाचे चित्र! शेवटी एकदा वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये  भारताने इंग्लंडच्या संघाला तंबूत धाडले आणि सान  होजे कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा एकच गजर झाला!...इतक्या जोरात, की   तिथे काम करणाऱ्या अमेरिकन लोकांच्या काळजात धडधडलेच! त्यातल्या एकाने दचकून मला विचारले, व्हॉट हापंड? ... मी हसून म्हटले, यु वुडन्ट नो!

पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेझ ग्रांट, बीएमएमचे अध्यक्ष संदीप दीक्षित अन्  अधिवेशनाचे प्रमुख संयोजक प्रकाश भालेराव यांच्या उपस्थितीत एकाच वेळी विविध दालनात सुरु झालेल्या सत्रांनी संमेलनाचा शुभारंभ झाला. 

मैफल रंगलीपर्सिस्टंटचे प्रमुख आनंद देशपांडे, भारत विकास ग्रुपचे हणमंतराव गायकवाड, रवी पंडित, वैभव दाभाडे आदी प्रमुख उद्योजकांसोबत महत्वाची सत्रे  संपन्न तब्बल सहा हजार लोकांनी नोंदणी केलेले हे आजवरचे सर्वात भव्य बीएमएम अधिवेशनआहे.  सण होजेच्या डाउनटाऊनमधले महत्वाचे चौक रेशमी साड्या आणि कुर्त्यानी गजबजून गेले आहेत.  पहिल्या रात्री झालेल्या रंगारंग बँक्वेट डिनरसाठी जगप्रसिद्ध जॅझ कलाकार जॉर्ज ब्रुक्स यांची मैफल रंगली.

गुंतागुंतीचे पदर उलगडलेनिवृत्त जीवनाचे गुंतागुंतीचे पदर उलगडत लोकमतच्या कार्यकारी संपादक अपर्णा वेलणकर यांनी केलेल्या बीजभाषणाने डोळे पाणावलेले उपस्थित नंतर ज्येष्ठ नागरिकांच्या धमाल फॅशन शो मध्ये रंगून गेले! त्यात ठसकेबाज लावण्यांपासून हाफ चड्डी घालून आलेल्या दादा कोंडकेंपर्यंत कहर धमाल होती!..रात्री ‘सारेगम’च्या गाण्यांची मैफल रंगली ! ...आणि झाली अवचित भेट ‘मी कोण आहे माहिती आहे का, विंदा पणजोबांची पणती’ असे सांगत मराठी शाळांच्या दालनात चिमुकल्या अन्वयी काळेने आपल्या अमेरिकन वळणाच्या गोड मराठीत विंदा करंदीकरांच्या कविता सादर केल्या! अल्याड-पल्याडच्या दहा हजार मैलांना क्षणात जोडणारा  इतका सुंदर पूल दुसरा कुठला असेल? 

टॅग्स :marathiमराठी