उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला असून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तर दुसरीकडे जगभरात बलात्काराच्या, महिलांवरील अत्याचाराच्या घटना या सातत्याने समोर येत आहे. जगात एक असं गाव आहे जिथे फक्त आणि फक्त महिलाराज असलेलं पाहायला मिळतं. पुरुषांना या गावात नो एंट्री आहे. उमोजा उसाओ असं या गावाचं नाव असून ते केनियामध्ये आहे. केनियाची राजधानी नैरोबीपासून 380 किमीवर साम्बुरु काउंटी मधील आर्चर पोस्ट शहराजवळ हे गाव वसलं आहे.
काही वर्षांपूर्वी केनियामध्ये ब्रिटिश सैनिकांनी हजारो महिलांवर बलात्कार केला. यामध्ये अनेक महिलांचा मृत्यू झाला तर काहींना त्यांच्या कुटुंबानेही घराबाहेर काढलं. खूप महिला यामुळे निराधार झाल्या. निराधार झालेल्या काही माहिलांनी या घटनेनंतर स्वत:चं गाव वसवलं असून येथे फक्त महिलाच राहतात. रेबेका लोलोसोली यांनी 15 महिलांच्या मदतीनी 1990 मध्ये वसवलं होतं. उमोजा उसाओ असं या गावाचं नाव असून स्वाहिली भाषेमध्ये उमोजाचा अर्थ होतो एकता आणि उसाओ गावापासून वाहणाऱ्या नदीचं नाव उमोजा आहे.
ब्रिटिश सैनिकांनी 1400 पेक्षा जास्त महिलांवर केला बलात्कार
एका मीडिया रिपोर्टनुसार, केनियामध्ये ब्रिटिश सैनिकांनी 1400 पेक्षा जास्त महिलांवर बलात्कार केला होता. काही महिलांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला. ज्या महिलांवर बलात्कार झाला होता त्यांच्या कुटुंबांनी त्यांना स्वीकारलं नाही. त्यामुळे अशा महिलांनी एकत्र येऊन हे गाव उभारलं आहे. अनेक महिलांना या गावात आसरा देण्यात आला आहे. विधवा महिला तसेच पीडित महिला या गावात गेल्या कित्येक वर्षांपासून एकत्र राहत आहेत.
वयाच्या 18 व्या वर्षी मुलालाही काढलं जातं गावाबाहेर
या गावातील सर्वात वयस्कर महिला 98 वर्षाची तर सर्वात कमी वय असलेली मुलगी 6 महिन्यांची आहे. जर गावात एखाद्या मुलाचा जन्म झाला तर तो मुलगा 18 वर्षांचा होईपर्यंत गावात राहू शकतो. त्यानंतर त्याला गाव सोडून बाहेर जावं लागतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. बलात्काराच्या घटनेत वाढ होत असून अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. याच दरम्यान एका देशाने मोठा निर्णय घेतला आहे. बलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करण्यात येणार आहे.
बलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय
बलात्काराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी आता दोषींना नपुंसक करण्याचा निर्णय नायजेरियातील कदुना प्रांतातील सरकारने घेतला आहे. तसेच 14 वर्षाखालील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यास दोषीला फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. पण याच दरम्यान बलात्काराच्या घटनेत वाढ झाली आहे. लोकांमध्ये यामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नायजेरियातही या घटना सातत्याने वाढत होत आहेत. लोकांचा रोष इतका वाढला की राज्यपालांना आणीबाणीच जाहीर करावी लागली. राज्यपाल नसीर अहमद इल रुफई यांनी गुन्हेगारांपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी कडक पावलं उचलण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे.