ब्रिटनमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेत बिघाड झाला आहे, यामुळे हवाई मार्ग बंद करण्यात आला आहे. नेटवर्कमधील बिघाडामुळे विमानांच्या वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. यूके एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या संगणक प्रणालीमध्ये नेटवर्क बिघाड आढळून आल्याचे स्कॉटिश एअरलाइन लोगनएअरने सांगितले. यासोबतच आंतरराष्ट्रीय उड्डाणे उशीरा होण्याची शक्यता असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
ब्रिटनमधील हवाई विभागातील अधिकाऱ्याने दिलेली माहिती अशी,आम्हाला तांत्रिक समस्येचा सामना करावा लागत असून सुरक्षा राखण्यासाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा तांत्रिक दोष शोधून दूर करण्याचे काम अभियंते करत असल्याचे त्यांनी सांगितले.
रिपोर्ट्सनुसार, नॅशनल एअर ट्रॅफिक सर्व्हिसेसने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे आणि आम्ही ते लवकरात लवकर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. याचे कारण काय आहे किंवा ते दुरुस्त करण्यासाठी किती वेळ लागेल याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
स्कॉटिश एअरलाइन्स लोगनायर आणि इझीजेट या दोन्ही कंपन्यांनी प्रवाशांना इशारा दिला आहे. फ्लाइट्सला विलंब होऊ शकतो.