वॉशिंग्टन : ब्रिटन आणि युरोपही आता सुरक्षित राहिले नाहीत, अशा शब्दांत रिपब्लिकनचे प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रसेल्स हल्ल्यावर भाष्य केले आहे. येथे एका वृत्तसंस्थेशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, युरोपमधील परिस्थिती कठीण आहे. तथापि, अमेरिकन नागरिकांसाठी अमेरिका सुरक्षित आहे, असाही विचार मी कधी केला नाही. इंग्लंड असो की, ब्रसेल्स अथवा युरोप हे आता सुरक्षित राहिलेले नाहीत. अमेरिकेचे विदेशमंत्री जॉन केरी यांनी जनतेला नुकतेच आवाहन केले आहे की, युरोपात गेल्यावर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी यावर भाष्य केले आहे, हे विशेष.