असं म्हणतात की, कधी कुणाचं नशीब कसं बदलेल काहीच सांगता येत नाही. या जगात असे अनेक लोक आहेत जे मिनिटांमध्ये लखपती आणि कोट्याधीश होतात. तेच काही लोक थेट श्रीमंताचे गरिब होतात. पण एक घटना अशी समोर आली आहे, ज्यात एक आई आणि मुलाचं नशीब एकत्र फळफळलं आहे. दोघेही एकाचवेळी लखपती झाले आहेत. दोघांनाही अचानक ३०-३० लाख रूपयांची लॉटरी लागली. त्यामुळे या घटनेची चर्चा सगळीकडे होत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, इंग्लंडच्या (England) बुटलेमध्ये राहणारी ६० वर्षी कॅथलीन मिलर आणि तिचा ३५ वर्षीय मुलगा पॉलचं अचानक नशीब फळफळलं. दोघेही काही मिनिटांमध्ये लखपती झाले. ते ३०-३० लाख रूपयांचे मालक झाले. असं सांगितलं जात आहे की, दोघांनीही पीपुल्स पोस्टकोड लॉटरीच्या माध्यमातून रक्कम जिंकली. मोठी बाब तर ही आहे की, कॅथलीन पहिल्यांदाच लॉटरीचा गेम खेळत होती. ३० लाख रूपयांची लॉटरी लागल्यावर कॅथलीन आणि पॉल दोघेही आनंदी आहेत.
त्यांनी सांगितलं की, मला लॉटरीमध्ये इंटरेस्ट नाही. त्यानंतरही माझ्या मुलाने मला लॉटरी खेळण्यासाठी तयार केलं. मी फार आनंदी आहे की, मी माझ्या मुलाचं म्हणणं ऐकलं. पण मला अजिबात विश्वास नव्हता की, आम्ही लॉटरी जिंकू. जेव्हा त्यांच्या घरी पैसे देण्यासाठी पीपुल्स पोस्टकोड लॉटरी एम्बेसेडर मॅट जॉनसन आले तर दोघेही उत्साही दिसले.
दरम्यान, हे बक्षीस पीपुल्स पोस्टकोड लॉटरीच्या स्पेशल ख्रिसमल कॅम्पेनचा भाग होतं ज्यात लकी ड्रॉ दरम्यान ३० लाख रूपये जिंकणाऱ्यांची नावे काढली गेली. अशाप्रकारे काही मिनिटात आई-मुलगा दोघांचं नशीब बदललं आणि दोघेही लखपती झाले.