शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

कोविडचा नवीन व्हेरिएंट ब्रिटनमध्ये करणार कहर? बार्बेनहाइमर इफेक्ट ठरणार मुख्य कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 6:47 PM

या नवीन व्हेरिएंटचे नाव EG5.1 आहे, ज्यामुळे ब्रिटनमध्ये कहर होत असल्याचे म्हटले जात आहे. पूर्वी या व्हेरिएंटला एरिस म्हणत होते. 

लंडन : ब्रिटनमध्ये कोविडचा एक नवीन व्हेरिएंट सापडला आहे. मात्र, यामुळे घाबरण्याची गरज नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा एजन्सीच्या (UKHSA) अधिकाऱ्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मे महिन्यापासून नवीन व्हेरिएंटची सात प्रकरणे आढळली आहेत. तसेच, लोकांना याची लागण होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे, असे UKHSA च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. चिंतेची बाब अशी आहे की, देश एका नव्या लाटेच्या तडाख्यात येणार आहे. या नवीन व्हेरिएंटचे नाव EG5.1 आहे, ज्यामुळे ब्रिटनमध्ये कहर होत असल्याचे म्हटले जात आहे. पूर्वी या व्हेरिएंटला एरिस म्हणत होते. 

दरम्यान, शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, नवीन कोविड व्हेरिएंट जुन्यापेक्षा जास्त धोकादायक असण्याची लक्षणे नाहीत. अधिकारी त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच, तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, या नवीन स्ट्रेनच्या प्रादुर्भावमध्ये बार्बेनहाइमर इफेक्ट देखील आहे (बार्बेनहाइमर हा शब्द नव्याने प्रदर्शित झालेल्या ओपेनहाइमर आणि बार्बी चित्रपटापासून घेतले आहेत). याशिवाय, अलीकडचे खराब हवामान आणि लोकांची कमकुवत प्रतिकारशक्ती यामुळे त्याचा प्रसार होण्यास हातभार लागला आहे.

याचबरोबर, रीडिंग युनिव्हर्सिटीचे मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. सायमन क्लार्क म्हणाले, 'कोविडमध्ये सतत बदल आणि परिस्थितीशी जुळवून घेणे चालू राहील. त्यामुळे त्याच्या नवीन व्हेरिएंटमुळे आपल्याला घाबरण्याची आणि काळजी करण्याची गरज नाही. लसीकरणामुळे लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत आहे. जरी संसर्गाची संख्या वाढत आणि कमी होत असली तरी लोकांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याची आणि मृत्यूची भीती कमी होत आहे. 

दुसरीकडे, प्रोफेसर पॉल हंटर म्हणाले की, कोविडचा नवीन व्हेरिएंट मागीलपेक्षा 20.5% वेगाने पसरत आहे. हा व्हेरिएंट नुकताच प्रदर्शित झालेला बार्बी आणि ओपेनहायमर चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात जाणाऱ्या लोकांमध्ये वेगाने पसरण्याचा धोका आहे, असे प्रोफेसर पॉल हंटर  यांनी सांगितले. तसेच, याला बार्बेनहाइमर इफेक्ट असेही म्हणतात. याशिवाय खराब हवामान देखील संसर्गाचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडHealthआरोग्य