ब्रिटन-
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी आठवडाभरातच आपल्या परराष्ट्र धोरणात भारतासोबतच्या संबंधांवर अधिक भर देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर ऋषी सुनक यांनी आपले परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेवरली यांना भारत दौऱ्यावर पाठवलं आहे. २८ ऑक्टोबरला ते भारतात आले होते जिथं त्यांनी मुंबईत संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी परिषदेत भाग घेतला होता. पदभार स्वीकारल्यानंतर ऋषी सुनक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर बराचवेळ चर्चा देखील केली.
यानंतर त्यांनी परराष्ट्रमंत्र्यांना भारत भेटीवर पाठवले आहे. यादरम्यान त्यांनी मुंबईतील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांचीही भेट घेतली. आज ते दिल्लीत पोहोचले असून त्यांनी पत्रकारांशी बोलताना ऋषी सुनक यांचे कौतुक केले. 'मी ऋषी सुनक यांच्यासोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे, मला माहित आहे की ते एक अतिशय उत्कृष्ट पंतप्रधान म्हणून सिद्ध होतील', असं परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेवरली म्हणाले.
भारतासोबतचे संबंध अधिक दृढ होतीलभारतासोबतच्या संबंधांवर क्लेवरली म्हणाले की, "माझ्यासाठी भारतासोबतचे संबंध खूप महत्त्वाचे आहेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत हा इंडो-पॅसिफिकमध्ये ब्रिटनचा नैसर्गिक भागीदार आहे. ही एक आर्थिक आणि तांत्रिक शक्ती आहे. आमचे मजबूत संबंध आमच्या दोन्ही अर्थव्यवस्थांना चालना देतील आणि जागतिक सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी मदत करतील"
परिषदेच्या बाहेरही चर्चा होऊ शकतेब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भारत दौऱ्याचे तीन मुख्य मुद्दे आहेत, ज्यामध्ये सर्वाधिक लक्ष दोन्ही देशांमधील एफटीएवर आहे. त्यात संरक्षण आणि सुरक्षा भागीदारी आणि सायबर सुरक्षा सहकार्याचाही समावेश असेल. शनिवारी क्लेवरली यांचे नवी दिल्ली येथे आगमन झाले जिथं ते संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद-दहशतवाद विरोधी समितीच्या (UNSC-CCT) विशेष बैठकीला उपस्थित राहिले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आपल्या ब्रिटीश समकक्षांशी बैठकीच्या वेळी अनेक विषयांवर चर्चा करू शकतात.
ऋषी सुनक आणि पंतप्रधान मोदींमध्ये संवादब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी ऋषी यांना पदभार स्वीकारल्यानंतर शुभेच्छा दिल्या, त्यानंतर फोनवर झालेल्या चर्चेत ऋषी यांनी त्यांचे आभार मानले. आम्ही आमचे सुरक्षा, संरक्षण आणि आर्थिक संबंध मजबूत राहिल्याने ते उत्साहित असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी त्यांचे ब्रिटिश समकक्ष सुनक यांच्याशी फोनवर बोलून पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. मोदींनी ट्विट करत सुनक यांचे अभिनंदन केले होते.