शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Britain Prime Minister: ब्रिटन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मूळ भारतीय ऋषी सुनक पिछाडीवर - सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 2:06 PM

लिझ ट्रस यांनी कर कमी करण्याच्या आश्वासनावर निवडणूक लढवली आहे. पंतप्रधान झाल्यास १.२५ टक्क्यांपर्यंत कर कपात करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, तर ऋषी सुनक याउलट कर वाढवण्याचा आग्रह धरत राहिले

ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाच्या निवडणुकीचा निकाल अगदी काही तासांवर येऊन ठेपला आहे. याठिकाणी निकालाचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. आज म्हणजेच ५ सप्टेंबरला ब्रिटनला नवा पंतप्रधान मिळणार आहे. या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक(Rishi Sunak) आणि लिझ ट्रस(Liz Truss) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या निकालापूर्वी मतदानपूर्व घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात ऋषी सुनक लिझ ट्रस यांच्या मागे असल्याचं सांगण्यात येत आहे.

अहवालानुसार, लिझ ट्रस यांच्या विजयाची शक्यता जास्त आहे. देशात रोजगार संकट, औद्योगिक अशांतता आणि मंदीचा सामना करत असताना देशाची सत्ता हाती घेण्यास लिझ सज्ज आहेत. YouGov सर्वेक्षणानुसार, लिझ ट्रसने २०-२१ जुलै दरम्यान पहिल्या फेरीत ऋषी सुनक विरुद्ध ६२% ची सुरुवातीची आघाडी घेतली, जी २९ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत ६९% आणि १७ ऑगस्टपर्यंत ६६% पर्यंत वाढली. विशेष म्हणजे ऋषी सुनक यांची लोकप्रियता २०२० मध्ये ४१% होती जी २०२२ मध्ये २६% वर आली आहे.

ऋषी सुनक यांच्या पिछाडीचं कारणं काय?बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच ऋषी सुनक यांचे नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत होते, परंतु आता त्यांच्या विजयाची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे आणि लिझ ट्रस ब्रिटनच्या पुढील पंतप्रधान होऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवडणूक प्रचारादरम्यान, ऋषी सुनक हे देशातील समस्यांबाबत जनतेवर फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत तर कंझर्व्हेटिव्ह पक्षातील त्यांच्या प्रतिस्पर्धी लिझ ट्रस हे करण्यात यशस्वी ठरल्या आहेत.

कर वाढवण्याचा आग्रहलिझ ट्रस यांनी कर कमी करण्याच्या आश्वासनावर निवडणूक लढवली आहे. पंतप्रधान झाल्यास १.२५ टक्क्यांपर्यंत कर कपात करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, तर ऋषी सुनक याउलट कर वाढवण्याचा आग्रह धरत राहिले. कर कपातीचा फायदा फक्त श्रीमंतांनाच होईल, त्यामुळे त्याची गरज नाही असे ऋषी सुनक यांनी म्हटलं. खोटी आश्वासने देण्यापेक्षा मी हार मानेन असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. मी पंतप्रधान झालो तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी काम करायला आवडेल असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. 

'द गार्डियन'च्या संपादकीयानुसार, ट्रेड मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ऋषी सुनक यांचे रेटिंग खूप जास्त होते, परंतु काही कंझर्व्हेटिव्ह खासदार आणि पक्षाच्या सदस्यांचा असा दावा होता की सुनक यांच्यामुळे जॉन्सन यांना राजीनामा द्यावा लागला. सुनक यांनी पाठीमागून खंजीर खुपसला. सुनक ही अशी व्यक्ती होती ज्यांनी एक प्रकारे बोरिस जॉन्सन सरकार पाडलं. तेही जेव्हा जॉन्सनने सुनकची राजकीय कारकीर्द पुढे नेली होती. या सर्व कारणांमुळे लोकांमध्ये सुनक यांच्या विरोधात नाराजी दिसून येत आहे.

पत्नी अक्षता ब्रिटीश महाराणी एलिझाबेथपेक्षाही श्रीमंत असल्याचा दावासुरुवातीला 'रेडी फॉर ऋषी' या कॅम्पेन व्हिडिओनंतर चित्र बदललेलं दिसत होतं, सुनक जिंकू शकतात, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र काही काळाने पक्षाचे सदस्य त्यांची साथ सोडताना दिसले. साजिद जाविद, नदीम जाहवी आणि मॉर्डंट या खासदारांनी ऐनवेळी भूमिका बदलली. द संडे टाइम्सच्या वृत्तानुसार, निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यानंतर ऋषी सुनक यांच्यावर शहरी भागातील लोकांकडून प्रचारासाठी आर्थिक मदत घेतल्याचा आरोप करण्यात आला. पत्नी अक्षता या ब्रिटीश महाराणी एलिझाबेथपेक्षाही श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे ४३० लाख पौंडांची संपत्ती असल्याचा दावा करण्यात येत होता. 

टॅग्स :Boris Johnsonबोरिस जॉन्सन