शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

Coronavirus : भारताला देण्यासाठी आमच्याकडे अधिकचे लसीचे डोस नाही; ब्रिटनचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 4:18 PM

Coronavirus In India : सध्या भारतात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद. ब्रिटनकडून लसींव्यतिरिक्त अन्य वैद्यकीय वस्तूंच्या पुरवठ्याला सुरूवात

ठळक मुद्देब्रिटनकडून लसींव्यतिरिक्त अन्य वैद्यकीय वस्तूंच्या पुरवठ्याला सुरूवातसध्या भारतात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद.

सध्या भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं ३ लाखांच्या वर कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत देशातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी सध्या लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचंही म्हटलं जात आहे. भारतातही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी लसीकरणासाठी लसी उपलब्ध नसल्याचंही सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे ब्रिटनसारखा देशही कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडे कोरोना लसीचे अधिकचे डोस नाहीत, जे आपण या परिस्थितीत भारत किंवा अन्य देशांना देऊ शकू, असं स्पष्टीकरण ब्रिटननं दिलं आहे. बुधवारी ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हेनकॉन यांनी यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं. "आमच्याकडून भारताला ४९५ ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्स, १२० नॉन इनव्हेजिव्ह व्हेंटिलेटर्स, २० मॅन्युअल व्हेंटिलेटर्सचा पुरवठा केला जात आहे. मंगळवारी सकाळी ब्रिटनकडून ९५ ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्स, १०० व्हेंटिलेटर्सची पहिली खेप भारताला पोहोचली आहे," अशी माहिती ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या प्रवक्त्यांनी दिली. "ज्या देशांना आवश्यकता आहे अशा देशांना वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा करणार असल्याचं आम्ही फेब्रुवारी महिन्यात आश्वासन दिलं होतं. ज्या गोष्टी आमच्याकडे अधिक प्रमाणात उपलब्ध असतील त्यांचा पुरवठा केला जाईल. सध्या आमचं प्राधान्य ब्रिटनचे नागरिक आहेत. यामुळे सध्या आमच्याकडे लसीचे अतिरिक्त डोस नाहीत. परंतु आम्ही सातत्यानं समीक्षा करत आहोत. जोपर्यंत या महासाथीपासून लोकं सुरक्षित नाहीत तोवर कोणीही सुरक्षित नाहीत. म्हणूनच ब्रिटननं कोरोना महासाथीचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. तसंच भारतालाही संबंधित उपकरणं आणि ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्सचा पुरवठा केला आहे," असं त्यांनी नमूद केलं. भारतीय वंशाच्या नागरिकांकडूनही मदतयादरम्यान ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाच्या लोकांनीही मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला आहे. ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्ससहित अन्य वस्तूंच्या पुरवठ्यासाठी हा निधी खर्च केला जाईल. आतापर्यंत ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबियासारख्या देशांनी भारताकडे मदतीचा हात पुढे केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीBoris Johnsonबोरिस जॉन्सनEnglandइंग्लंड