देहविक्रीच्या दलदलीतून थेट मृत्यू दारात गेलेल्या एका महिलेच्या वेदनादायी अनुभवाने ब्रिटनमध्ये (Britain) सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. महिलेला दररोज २० लोकांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी (Prostitution) तिला भाग पाडलं जात होतं. नकार दिला तर तिला बेदम मारहाण केली जात होती. सिगारेटचे चटके दिले जात होते. तिला फारच गंभीर स्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टर म्हणाले होते की, ती फार फार तर ४८ तास जगू शकेल. पण महिलेने मृत्यूला मात दिली. आता पोलीस तिच्या मदतीने सेक्स रॅकेटशी संबंधित आरोपींचा शोध घेत आहेत.
दोन आणखी तरूणी होत्या सोबत
'द सन' च्या रिपोर्टनुसार, महिलेने बीबीसीच्या एका डॉक्यूमेंट्रीमध्ये सांगितलं की, ज्या घरात तिला कैद करण्यात आलं होतं, तिथे दोन आणखी तरूणी होत्या. सर्वांना त्यांच्या मनाविरूद्ध क्लाएंटसमोर पाठवलं जात होतं. एका दिवशी त्यांनी २० पेक्षा जास्त लोकांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं जात होतं आणि नकार दिला की मारहाण करत होते. महिलेने सांगितलं की, अनेक नशा करणारे लोकही तिथे येत होते. जे पाच ते सहा तास त्यांचं शोषण करत होते.
रोमानियावरून घेऊन आला होता प्रियकर
महिलेने सांगितलं की, एका तरूणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून रोमानियाहून यूकेमध्ये घेऊन आला होता आणि मग West Midlands मधील एका फ्लॅटमध्ये कैद केलं होतं. ब्रिटनमध्ये सेक्स वर्क लीगल आहे. त्यामुळे येथील छोट्या छोट्या घरांमध्ये हेच काम चालतं. दुसऱ्या देशातील तरूणी पळवून आणून इथे विकल्या जातात. या दलदलीतून बाहेर निघालेल्या महिलेने सांगितलं की, ती दररोज हजार पाउंड कमावत होती. पण सगळा पैसा ते लोक घेऊन जात होते, ज्यांना त्यांनी खरेदी केलं होतं. त्यांच्यावर सतत लक्ष ठेवलं जात होतं.
जिवंत वाचणं चमत्कार
महिलेला मारहाण केल्यानंतर मरण्यासाठी सोडून देण्यात आलं होतं. पण कसातरी तिचा जीव वाचला. ती म्हणाली की, 'मला इंटरनल ब्लीडिंग होत होती. मला चालताही येत नव्हत आणि रेंगत जाणंही शक्य नव्हतं. मी बस मरणार होती'. Modern Slavery Charity Medaille साठी काम करणारी सिमोन लॉर्ड म्हणाली की, 'मी कुणालाही इतक्या वाईट स्थितीत पाहिलं नाही. तिला पुन्हा पुन्हा मारलं जात होतं. ती कुपोषणाची शिकार झाली होती. तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. डॉक्टरांनीही हात वर केले होते. तिचं जिवंत राहणं एका चमत्कारापेक्षा कमी नाही'.
शाळेतही राहतात एजंट
रोमानियामध्ये मानव तस्करीचे शिकार झालेल्या मुलांसाठी शेल्टर चालवणारी Iana Matei ने सांगितलं की, तरूणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून देहविक्रीच्या धंद्यात ढकललं जातं. गुन्हेगारांचे एजंट शाळांमध्येही असतात. ते तरूणींना प्रेमात अडकवतात आणि मग त्यांना बॉसच्या हवाली करतात. तिथून तरूणींना ब्रिटनसारख्या देशांमध्ये मोठ्या रकमेला विकलं जातं. ती म्हणाली की, 'माझ्या शेल्टरमध्ये एक तरूणी आहे. जिला आजही तिच्या ५२ वर्षीय प्रियकराकडे जायचं आहे. हे लोक तरूणींचा ब्रेन वॉश करतात'.