ऑनलाइन लोकमतलंडन, दि. ६ : इंग्लंडची राणी एलिझाबेथ टू यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त बीबीसी रेडिओ ४ या रेडिओ चॅनेल वर करण्यात आलेल्या राणीच्या सेक्स लाईफ बद्दलच्या टिप्पण्या या नैतिकतेला धरून नसून बीबीसीच्या संपादकीय तत्त्वांचा भंग करण्याऱ्या आहेत असे बीबीसी संस्थेने स्पष्ट केले आहे.
बीबीसी रेडिओ ४ या रेडिओ चॅनेल वर दाखवण्यात येणाऱ्या डेव्हिड बड्डीएल यांच्या शो मध्ये सहभागी व्यक्तींना एक विषय दिला जातो त्यावर ही सर्व मंडळी चर्चा करतात. आधीच रेकॉर्ड करण्यात येणाऱ्या या शो मध्ये राणी एलिझाबेथ टू यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त "द क्विन मस्ट हॅव हॅड सेक्स एॅटलिस्ट फाईव्ह टाईम्स" (राणी ने कमीत कमी पाच वेळा तरी सेक्स केला आहे) असा विषय देण्यात आला होता. या विषयावर सहभागी व्यक्तींनी विविध मतं प्रदर्शित केली होती. ही मतं 'वैयक्तिक आणि बदनामीकारक' असल्याचे बीबीसी ट्रस्ट ने म्हटले आहे. या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा डेव्हिड बड्डीएल यांनी या प्रकारासंबंधी माफी मागितली आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध विनोदी नट रसेल केन हा देखील सहभागी झाला होता आणि त्याने राणी एलिझाबेथ टू च्या सेक्स लाईफ बद्दल विनोद केले होते.