लंडन : भारतातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी सामाजिक संस्थांच्या मार्फत जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला आर्थिक पाठबळ पुरविण्यासाठी ब्रिटिश सरकार व काही स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जारी करण्यात आलेल्या १० दशलक्ष डॉलर मूल्याच्या डेव्हलपमेन्ट इम्पॅक्ट बाँडचे (डीआयबी) उद्घाटन ब्रिटनचे युवराज चार्ल्स यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यातून मिळणाºया मदतीचा भारतातील दोन लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.ब्रिटनचे आंतरराष्ट्रीय घडामोडीविषयक खाते व कॉमिक रिलिफ, मित्तल फाऊंडेशन, यूबीएस आॅप्टिमस फाऊंडेशन या तीन स्वयंसेवी संस्थाच्या संयुक्त विद्यमाने हे बॉँड काढण्यात आले आहेत.या बाँडमधून जो निधी उभा राहीलतो भारतातील शिक्षणाचादर्जा उंचावण्यासाठी कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांना देण्यात येईल.>२ लाख लाभार्थीया निधीतून मुख्याध्यापक तसेच शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल, तसेच शाळा व्यवस्थापनाविषयीचे अद्ययावत प्रशिक्षणही संबंधितांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमांमुळे भारतातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होणार असून त्याचा फायदा २ लाख भारतीय विद्यार्थ्यांना होईल.
भारतीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला ब्रिटनचे पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 4:15 AM