पॅरिस : मार्क ब्युमॉन्ट या ब्रिटिश सायकलपटूने ७८ दिवसांत सायकलने पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करून सर्वात कमी वेळात जगप्रवास करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दररोज सरासरी १८ तास याप्रमाणे सायकल चालवून मार्कने पोलंड, रशिया, मंगोलिया, चीन, आॅस्ट्रेलिया आणि अमेरिका हे देश पार केले आणि पॅरिसमधील ‘आर्क डी ट्रायम्फ’ (विजय कमान) येथे आपल्या या १८ हजार मैलाच्या (२९ हजार किमी) सफरीची सांगता केली.सायकलने ही पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करण्यास मार्कला ७८ दिवस, १४ तास ४० मिनिटे एवढा वेळ लागला. सायकलने सर्वात कमी वेळात जगप्रवास करण्याचा हा नवा विक्रम असल्याचे ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने जाहीर केले. या आधीचा विक्रम अँड्र्यू निकलसन या न्यूझीलंडच्या सायकलपटूच्या नावे होता. त्याने ही सफर १२३ दिवसांत पूर्ण केली होती.मार्कच्या पृथ्वी प्रदक्षिणेची यशस्वी सांगता झाल्यावर ‘गिनीज बुक’तर्फे त्याला दोन प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यापैकी एक होते सर्वात कमी वेळात जगाची सफर पूर्ण केल्याचे. दुसरे होते एका महिन्यात सर्वात जास्त अंतर सायकल चालविल्याचे. प्रवास सुरु केल्यावर नवव्या दिवशी रशियात झालेल्या अपघातात मार्कचे दात पडले व हाताच्या कोपराचे हाड मोडले. परंतु विचलित न होता मार्कने मनोनिग्रह कायम ठेवून प्रवास सुरूच ठेवला. यादृष्टीने हा प्रवास शारीरिक क्षमतेइतकाच मानसिक कसोटी घेणारा होता. याचे इंगित सांगताना मार्क म्हणाला, झोपेचे पुरते खोबरे होत असूनही रोजच्या रोज मनालादुसºया दिवसासाठी तयार करीत राहिलो! (वृत्तसंस्था)>क्षितिजाला गवसणीया अडीच महिन्यांत मी पायेने क्वचितच चाललो. खरे तर हा प्रवास एका क्षितिजापासून निघून दुसºया क्षितिजाला गवसणी घालण्याचा होता!- मार्क ब्युमॉन्ट,ब्रिटिश सायकलपटू.
ब्रिटिश सायकलपटूने केली ७८ दिवसांत पृथ्वीप्रदक्षिणा, रोज १८ तासांचा प्रवास, गिनीज बुकमध्ये झाली नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 4:32 AM