कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 9 कोटींवर गेली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे चिंतेत भर पडली आहे. नव्या स्ट्रेनमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे ब्रिटनचीही चिंता वाढली आहे. नव्या स्ट्रेनमुळे मृतांची संख्या वाढण्याचा धोका असल्याची भीती ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी व्यक्त केली आहे.
बोरिस जॉन्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असताना मृत्यू दर वाढण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनवर दोन्ही लस प्रभावी आहेत. ब्रिटनमध्ये 5.38 लाख लोकांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत चार लाख 9 हजार 85 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याचे संख्येत थोडी घट झाली आहे.
नव्या स्ट्रेनमुळे चिंता वाढली आहे. व्हायरसला रोखण्यासाठी कठोर होणं गरजेचं आहे. तसेच लोकांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे. प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना लशीचा डोस घेतला असला तरी नागरिकांनी घरीच थांबावे असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केलं आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे लोकांनी कोरोनानी धसका घेतला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत हजारो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जगभरातील अनेक देश हे कोरोना लसीसाठी आता भारताकडे मदत मागत आहेत. भारताकडे मदत मागणाऱ्या या देशांच्या यादीमध्ये आता डोमिनिकन रिपब्लिकच्या नावाचाही समावेश झाला आहे. डोमिनिकन रिपब्लिकचे पंतप्रधान रूझवेल्ट स्कॅरिट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. तसेच भारताने कोरोना लसीचे 70 हजार डोस मदत म्हणून पाठवावेत अशी मागणी केली आहे. भारताने भूतान आणि मालदीव या देशांना कोरोना लसींचा पुरवठा केला आहे. भारत सरकारने कोरोना लसीकरण मोहिमेसाठी सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार डोमिनिकन रिपब्लिकचे पंतप्रधान स्कॅरिट यांनी पत्रात "जगाने 2021 मध्ये प्रवेश केल्यानंतरही आपल्या सर्वांची कोविड-19 विरोधातील लढाई सुरू आहे. डोमिनिकनमधील 72 हजार लोकसंख्येला कोरोना लसीची खूप गरज आहे. यासाठी मी तुमच्याकडे विनंती करतो की, आमच्या देशातील जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी आमच्या गरजेनुसार कोरोना लसीचे डोस मदत म्हणून पाठवून आम्हाला सहकार्य करावे" असं म्हटलं आहे.