लग्नाचा अमृत महोत्सव (७५ वर्षे) महिनाभरापूर्वीच साजरा केलेली ब्रिटिश पत्नी आणि तिचा कॅनेडियन पती १५ सप्टेंबर रोजी ओटावातील क्वीन्सवे कार्लटन हॉस्पिटलमध्ये अवघ्या तासाभराच्या अंतराने हे जग सोडून गेले. जीन स्पिअर (९४) आणि जॉर्ज स्पिअर (९७) यांची १९४१ मध्ये लंडनमधील डान्स हॉलमध्ये भेट झाली. जीन यांचे पहाटे साडेचार वाजता निधन झाले. काही दिवसांपूर्वी न्युमोनिया झाल्यामुळे त्या रुग्णालयात होत्या. काही तासांनीच जॉर्ज स्पिअर यांनीदेखील शेवटचा श्वास घेतला. जॉर्ज हे युद्धात सहभागी झालेले होते. जीन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर दोन दिवसांनी जॉर्ज यांना गाढ झोप लागली. त्यांनाही त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे सकाळी ९.४५ वाजता निधन झाले.जॉर्ज व जीन यांचा विवाह ब्रिटनमधील किंग्स्टन येथे १९४२ मध्ये झाला होता. या जोडप्याच्या विवाहाच्या ७२ व्या वाढदिवशी वार्ताहरांशी बोलताना जीन यांनी सुखी विवाहाचे रहस्य सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या की, आम्ही जेव्हा भेटलो त्यावेळी खूप आनंदात होतो. आमचे लग्न झाले त्यावेळी आम्ही स्वर्गात आहोत, असे आम्हाला वाटले. आम्ही आमच्या सगळ््या आयुष्यात बºयावाईट प्रसंगांत. आम्ही एकत्र आहोत म्हणजे आमचे सगळे चांगले आहे हे आम्हाला माहीत होते व ही गोष्ट आम्ही नेहमीच मान्य केली.
ब्रिटिश पत्नी व तिचा कॅनेडियन पती या जोडप्याने घेतला अंतिम निरोपही एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 4:51 AM