लंडन - सुमारे ६० वर्षांपूर्वी बिहारच्या नालंदातील संग्रहालयातून चोरी गेलेली बुद्धमूर्ती लंडनच्या मेट्रोपोलिटन पोलिसांनी बुधवारी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात भारताला परत केली आहे.१९६१मध्ये नालंदा येथील भारतीय पुरातत्त्व विभागाच्या (एएसआय) संग्रहालयातून १४ मूर्ती चोरीला गेल्या होत्या. त्यात बुद्धाच्या चांदीचा मुलामा असलेल्या कांस्यमूर्तीचा समावेश होता. लंडनमध्ये लिलाव होण्यापूर्वी ही मूर्ती अनेकांच्या हाती लागली होती. बुद्धमूर्ती ही भारतातून चोरी गेलेल्या मूर्तीपैकी एक असल्याचे विक्रेत्याला कळले तेव्हा त्याने लंडनच्या पुरातत्त्व आणि कला विभागाशी सहकार्य करीत ती भारताला परत करण्याला सहमती दर्शविली, अशी माहिती मेट्रोपोलिटन पोलिसांनी दिली आहे. या वर्षी मार्चमध्ये एका मेळ्यात या मूर्तीची ओळख पटली. कलेसंबंधी गुन्हेगारीवर संशोधन करणाऱ्या एआरसीए या संस्थेच्या लिंडा अल्बर्टसन आणि इंडिया प्राईड प्रोजेक्टचे विजयकुमार यांनी त्याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. स्कॉटलंड पोलिसांनी भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त वाय.के. सिन्हा यांना बुधवारी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात ही मूर्ती परत केली. (वृत्तसंस्था)इतिहासाचा एक भाग असलेली मूर्ती परत करताना मला आनंद झाला आहे. कायदा अंमलबजावणी, व्यापार आणि विचारवंत यांच्यातील सहकार्याची ही निष्पत्ती असून अशा प्रकारचे अनोखे उदाहरण आहे. एवढ्या वर्षांपूर्वी मूर्ती चोरीला जाऊनही तिची ओळख कायम राहिली. सुमारे ६० वर्षांपूर्वी चोरीला गेलेल्या मूर्तीबाबत माहिती आणि नजर ठेवून पोलिसांपर्यंत जाणाºयांना त्याचे श्रेय द्यावे लागेल.- शैला स्टीवर्ट, मेट पोलीस गुप्तचर मुख्य निरीक्षक.
चोरलेली बुद्धमूर्ती भारताला परत, ब्रिटनने दिली स्वातंत्र्य दिनाची अनोखी भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 4:12 AM