पॅरिस: आयफेल टॉवरचे संभाव्य दहशतवादी हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी या टॉवरला बुलेटप्रूफ काचेचे कुंपण घालण्यात येत आहे. आयफेलच्या नूतनीकरणाची ३०० दशलक्ष युरो खर्चाची योजना मंजूर झाली आहे. या टॉवरभोवती लोखंडी कुपणाच्या जागी काचेचे कुंपण उभारण्यात येत आहे.टॉवर कुंपणाने बंदिस्त केला जाईल. त्यासाठी बुलेटप्रूफ काचेची ४५० पॅनेल्स बसविली जातील. यापैकी प्रत्येक काच सहा सेंमी जाड, तीन मीटर उंच व दीड टन वजनाची असेल. ही काच पारदर्शक असल्याने टॉवर पाहण्यात बाधा येणार नाही. सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्णहोईल. (वृत्तसंस्था)>पहारा सुरूचसन २०१५ च्या पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यानंतर आयफेल टॉवरची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.. काचेचे कुंपण घातल्यावरही टॉवरच्या भोवती व आतील उद्यानात सशस्त्र लष्करी जवानांचा पहारा सुरूच राहील.
आयफेल टॉवरला बुलेटप्रूफ कुंपण, संरक्षण करण्यासाठी उचलले पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 3:41 AM