कोरोना महामारीमुळे वाहन उद्योगाची स्थिती नाजूक आहे. कोरोनाचा सर्वाधिक परिणाम पुरवठा साखळीवर झाला. कंपन्यांना वाहने पोहोचवणे सर्वात कठीण जात होते. अशात वाहन उद्योगाचे कंबरडे मोडणारी आणखी एक घटना समोर आली आहे. अब्जावधी रुपयांच्या आलिशान गाड्यांनी भरलेले एक मालवाहू जहाज गुरुवारी अटलांटिक महासागरात जळाले.
कोट्यवधींच्या कार खाकएका बेंटले कारची किंमत ३ कोटी रुपयांपासून पुढे आहे. त्यामुळे जवळपास ५०० ते ६०० कोटींच्या १८९ कार जळून खाक झाल्या आहेत. एक मालवाहू जहाज जर्मनीहून अटलांटिक महासागरावाटे अमेरिकेत घेऊन जात होते. फेलिसिटी एस नावाच्या या मालवाहू जहाजाला भर समुद्रात अचानक भीषण आग लागली. आग एवढी भीषण होती की, जहाजावरील सर्व वाहने आणि इतर साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जहाजावीरल २२ क्रू मेंबर्स बचावले.
कोणती किती वाहने होती?
४,००० फोक्सवॅगन कंपनीच्या कार
१८९ फोक्सवॅगनची बेंटले
११०० पोर्शे कार एका पोर्शे कारची किंमत १ कोटीच्या आसपास आहे. अशा ११०० कार जळाल्या आहेत. त्यांची किंमत ११०० कोटी रुपयांच्या आहे.
यापूर्वी घडले असेच२०१९ मध्येही असेच घडले होते. ग्रँड अमेरिका हे मालवाहू जहाज २००० लग्झरी कार घेऊन निघाले होते. त्या जहाजाला आग लागली आणि ते पाण्यात बुडाले. त्यातही पोर्शे, ऑडी अशा अलिशान गाड्या होत्या.