ह्युस्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश (वरिष्ठ) (९४) यांचा दफनविधी गुरुवारी टेक्सासमध्ये होईल. तत्पूर्वी वॉशिंग्टनमध्ये नॅशनल कॅथेड्रलमध्ये अंत्यसंस्कारसंबंधी शासकीय सन्मान केला जाईल. बुश यांचे ३० नोव्हेंबर रोजी निधन झाले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवार हा राष्ट्रीय शोक दिन जाहीर केला आहे. सोमवारी टेक्सासमध्ये एअर फोर्स वन विमान पाठवून बुश यांचे पार्थिव वॉशिंग्टनला डी.सी.त आणले जाईल. तेथे लोकांना बुश यांचे अंतिम दर्शन घेता येईल. (वृत्तसंस्था)
जॉर्ज बुश यांचा गुरुवारी दफनविधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 3:49 AM