शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी इस्लामाबादला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गेले आहेत. दरम्यान, त्यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. या बैठकीत बोलताना परराष्ट्र मंत्री म्हणाले की, दहशतवाद असाच सुरू राहिला तर व्यवसायाला प्रोत्साहन देता येणार नाही. या दोन गोष्टी एकत्र येऊ शकत नाहीत. जेव्हा दोन्ही देश एकमेकांचा आदर करतात तेव्हाच परस्पर सहकार्य होऊ शकते. भागीदारी खरी असेल तेव्हाच सहकार्य शक्य आहे. एकतर्फी अजेंडांवरून संबंध प्रगती करू शकत नाहीत. एससीओच्या सनदेनुसार वागले तरच विकास साधता येईल,असा सल्लाही पाकिस्तानला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिला.
एस. जयशंकर पाकिस्तानमध्ये मॉर्निंग वॉक करताना... सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाले...
"सीमेपलीकडील दहशतवाद आणि कट्टरतावादाचा वापर केला तर व्यापार, ऊर्जा आणि कनेक्टिव्हिटी या क्षेत्रात प्रगती होऊ शकत नाही, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी बोलताना एस. जयशंकर म्हणाले की, जग कठीण परिस्थितीत आहे तेव्हा आम्ही भेटत आहोत. जगात दोन मोठे संघर्ष चालू आहेत, याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल, असंही ते म्हणाले. एस. जयशंकर काल शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी गेले आहेत. एस. जयशंकर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानला सुनावले आहे.
एस. जयशंकर म्हणाले की, विकास आणि प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य आवश्यक आहे यात शंका नाही. जर या गोष्टी झाल्या नाहीत तर विकासाची चर्चा होऊ शकत नाही, सर्वांनी मिळून कनेक्टिव्हिटीसाठी प्रयत्न केले तर नवीन क्षमता विकसित होतील. यामुळे जगाच्या ऊर्जेची गरज भागवण्यास मदत होईल. यामुळे जगात मोठ्या बदलांचा पाया रचला जाईल.