प्रश्न- मी पेशानं इंजिनीयर आहे. पण हौशी संगीतकार आहे. माझ्याकडे बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) व्हिसा आहे. त्याचा वापर मी याआधी त्याचा वापर अमेरिकेतील मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी केला आहे. माझ्या एका मित्रानं टेक्सासमध्ये म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन केलं आहे. तिथे येऊन कला सादर केल्यास मानधन देण्याचा प्रस्ताव मित्रानं मला दिला आहे. मी B1/B2 व्हिसाच्या आधारे प्रवास करताना म्युझिक कॉन्सर्टमध्ये कला सादर करू शकतो का?उत्तर- नाही. अमेरिकेचा इमिग्रेशन कायदा हौशी संगीतकार किंवा इतर हौशी कलाकारांना B1/B2 व्हिसाच्या आधारावर मानधन असलेल्या कार्यक्रमांमध्ये त्यांची कला सादर करण्याची परवानगी देत नाही. काही कलाकारांना अमेरिकेत येऊन त्यांची कला सादर करून मानधन स्वीकारण्याची इतर प्रकारचा व्हिसा असल्यास मिळू शकते. उदा. पी प्रकारचा व्हिसा. या व्हिसाच्या आधारे विविध प्रकारच्या कला सादर करणारे कलाकार, ऍथलिट्स अमेरिकेत येऊ शकतात. पी व्हिसा मिळवण्यासाठी अर्जदाराला त्याची नियुक्ती करणाऱ्या व्यक्तीनं किंवा संस्थेनं तशी विनंती करायला हवी. अशा प्रकारची याचिका यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसकडून (यूएससीआयएस) हाताळली जाते. याबद्दलची अतिरिक्त माहिती यूएससीआयएसच्या संकेतस्थळावर (www.uscis.gov/working-united-states/temporary-nonimmigrant-workers) उपलब्ध आहे.अमेरिकेच्या व्हिसाचा वापर सर्व नियमांच्या चौकटीत राहून कसा करायची, हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. B1/B2 व्हिसाचा वापर तुम्ही कोणकोणत्या गोष्टींसाठी करू शकतो, याबद्दलची अधिक माहिती http://travel.state.gov/content/travel/en/us-visas/tourism-visit/visitor.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
हौशी कलाकार B1/B2 व्हिसावर अमेरिकेत पेड परफॉर्मन्स करू शकतो का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 2:52 PM