वाॅशिंग्टन : स्मरणशक्ती कमी होण्याचा विकार ज्येष्ठ नागरिकांपैकी काही जणांना जडतो. माइल्ड कॉग्निटिव्ह इंपेयरमेन्टने (एमसीआय) ग्रस्त असलेल्यांपैकी संपूर्ण बरे होणाऱ्यांची संख्या कमी आहे. मात्र, अमेरिकी शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, ज्या समाजात वृद्धत्वाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जाते, ज्येष्ठ नागरिकांना आदराने वागविले जाते, तिथे ‘एमसीआय’ने पीडित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे.स्मरणशक्ती वयानुसार कमी होऊ लागते. ६५ वर्षांवरील व्यक्तींमध्ये ही समस्या अधिक आढळते. हा विकार जडलेले लोक अनेक गोष्टी विसरतात. त्यामुळे या व्यक्तींची नीट काळजी घेणे आवश्यक असते. (वृत्तसंस्था)
...तणाव होतो कमीस्मरणशक्ती कमी होण्याच्या विकाराबाबत अमेरिकेतील संशोधनात सहभागी झालेल्या शास्त्रज्ञ व येल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील मानसोपचारतज्ज्ञ बेका लिवी यांनी सांगितले की, वृद्धत्वाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले तर तणाव कमी होतो, आत्मविश्वास वाढतो, त्याप्रमाणे मेंदूची कार्यशक्ती टिकून राहण्यासही मदत होते.
अनेकदा या व्यक्ती घराबाहेर जातात व हरवतात. अशा लोकांचा शोध घेताना विशेष काळजी घ्यावी लागते. वयोवृद्धांसाठी सर्व सोयीसुविधांनी सज्ज अशा खास इमारतीदेखील अमेरिकेमध्ये बांधण्यात आल्या आहेत.
लक्षणे काय?nवृद्धावस्थेत अनेक गोष्टींचे विस्मरण होऊ लागते. एखाद्या ठिकाणी ठेवलेली वस्तू लक्षात राहत नाही. नाव, तारीख, शब्द आठवत नाहीत.nएखादी वस्तू समोर दिसत असली, तरी तिचे नाव न आठवल्याने संभाषणात अडचणी निर्माण होतात.nमनात कायम गोंधळ सुरू असतो. त्यामुळे छोटे-मोठे निर्णय घेताना तो माणूस सतत द्विधा मन:स्थितीत असतो.nओळखीचे लोक, नातेवाइक यांच्या नावांचे; तसेच आपल्या घराचा रस्ता याचे विस्मरण होते. nहा विकार झालेला माणूस चिडक्या स्वभावाचा बनतो.