Canada News : परदेशात चांगली नोकरी मिळेल, भरपूर पैसा मिळेल, चांगले आयुष्य जगता येईल...हे स्वप्न पाहून अनेक भारतीय परदेशात जातात. पण, अनेकदा त्यांचा भ्रमनिरास होतो. परदेशात चांगली नोकरी मिळेलच, याची शास्वती नसते. आता अशीच घटना कॅनडातून समोर आली आहे. येथील एका रेस्टॉरंटमध्ये वेटरच्या नोकरीसाठी लोकांनी लांबच लांब रांगा लावल्या. दोन दिवसांत 3000 हून अधिक लोकांनी या नोकरीसाठी अर्ज केला. विशेष म्हणजे, यातील बहुतांश भारतीय आहेत.
कॅनडातील ब्रॅम्प्टन येथे असलेल्या 'तंदूरी फ्लेम' या रेस्टॉरंटने वेटर आणि सर्व्हेंटच्या पदासाठी नोकरीची जाहिरात दिली होती. रेस्टॉरंटच्या कार्यकारी व्यवस्थापक इंदीप कौर यांच्या माहितीनुसार, या पदासाठी अवघ्या दोन दिवसांत 3000 उमेदवार आले. मुलाखतीसाठी आलेले बहुतांश लोक भारतीय होते. सोशल मीडियावर नोकरीच्या लाईनमध्ये थांबलेले भारतीय दिसत आहेत. मोठी स्वप्ने घेऊन कॅनडाला जाणाऱ्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या परमीटमध्ये 35% कपातकॅनडा हे भारतीयांचे फार पूर्वीपासून आवडते ठिकाण आहे. तिथे स्टुडंट व्हिसाच्या माध्यमातून वर्क परमिट, कायमस्वरूपी वास्तव्य आणि नंतर नागरिकत्व मिळवणे अगदी सोपे झाले आहे. मात्र, येत्या काळात भारतीय विद्यार्थ्यांनी कॅनडाला जाण्यापूर्वी विचार करण्याची गरज आहे. कारण कॅनडाने अलीकडेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा 35% ने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
याची घोषणा करताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी म्हटले की, 'वाईट लोकांनी' इमिग्रेशन धोरणाचा गैरवापर केला, तर कॅनडा त्यांच्यावर कठोर कारवाई करेल. कॅनडामधील तात्पुरत्या रहिवाशांची संख्या कमी करण्यासाठी परदेशी कामगारांसाठी नियम कडक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करताना ट्रूडो म्हणाले, 'आमचे सरकार यावर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या परमीटमध्ये 35% कपात करणार आहे.