गेल्या वर्षी कॅनडाने भारतावर गंभीर आरोप केले. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची हत्या भारत सरकारच्या इशाऱ्यावर करण्यात आली असल्याचा आरोप केला होता. यानंतर दोन्ही देशांकडून आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता दोन्ही देशांमधील संबंध सुधारताना दिसत असतानाच कॅनडाने पुन्हा एकदा भारतावर नवा आरोप केला आहे. त्यांच्या देशात सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये भारत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप कॅनडा सरकारकडून करण्यात आला होता. यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडूनही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि ते निराधार असल्याचे म्हटले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले,'परकीय हस्तक्षेपाची चौकशी करणाऱ्या कॅनेडियन कमिशनचे मीडिया रिपोर्ट्स आम्ही पाहिले आहेत. कॅनडाच्या निवडणुकीत भारताच्या हस्तक्षेपाचे असे निराधार आरोप आम्ही ठामपणे नाकारतो, इतर देशांच्या लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप करणे हे भारत सरकारचे धोरण नाही.
पाकिस्तान: मतदान सुरु असतानाच दहशतवादी हल्ला, निवडणूक कर्तव्यावर असलेले ४ पोलीस ठार
रणधीर जैस्वाल म्हणाले, 'येथे परिस्थिती उलट आहे. किंबहुना, याच्या अगदी उलट, कॅनडा आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत आहे. आम्ही त्यांच्यासोबत हा मुद्दा नियमितपणे मांडत आहोत आणि आम्ही कॅनडाला आमच्या मुख्य चिंता दूर करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्यास सांगत आहोत.
कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजेंस सर्व्हिस, देशाची सर्वोच्च विदेशी गुप्तचर संस्था, नुकत्याच एका अहवालात आरोप केला आहे की, भारत देशाच्या निवडणुकीत संभाव्य हस्तक्षेप करत आहे. अहवालात भारताला “परकीय हस्तक्षेपाचा धोका” असे वर्णन केले आहे आणि “कॅनडाच्या मजबूत लोकशाही संस्था आणि प्रक्रियांचे रक्षण करण्यासाठी” सरकारने आणखी काही करण्याचे निर्देश दिले आहेत. चीन आणि रशिया हे इतर दोन देश आहेत ज्यांना कॅनडाच्या राजकारणात हस्तक्षेप केल्याच्या आरोपांचा सामना करावा लागत आहे.