गेल्या काही दिवसापासून कॅनडा आणि भारत या दोन देशाचे संबंध बिघडले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येत भारत सरकारचा संबंध असल्याचा आरोप केला आहे, यावरुन आरोप-प्रत्यारोपही झाले. दरम्यान, भारताशी बिघडत चाललेल्या संबंधांदरम्यान कॅनडाच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे प्रमुख आणि विरोधी पक्षनेते पियरे पॉइलीव्हरे यांनी मोठे विधान केले आहे.
पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा निषेध केला असून ते कॅनडाचे पंतप्रधान झाल्यास भारतासोबतचे संबंध पूर्ववत करतील, असं ते म्हणाले. “आम्हाला भारत सरकारसोबत व्यावसायिक संबंध हवे आहेत. भारत ही पृथ्वीवरील सर्वात मोठी लोकशाही आहे. आपले मतभेद असणे आणि एकमेकांना जबाबदार धरणे ठीक आहे, पण आपल्याला व्यावसायिक संबंध ठेवायला हवे. मी या देशाचा पंतप्रधान झाल्यावर ते पुनर्संचयित करेन, असं पियरे पॉइलीव्हरे म्हणाले.
हल्ले वाढले, २ ओलीस सुटले; गाझावर इस्रायली हवाई मोहीम तीव्र, २४ तासांत ७०० हून अधिक मृत्यू
भारतातून ४१ कॅनेडियन मुत्सद्दी माघारी घेण्याबाबत पॉइलिव्हरे यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी ट्रुडो यांच्यावर आरोप केले. असेहीपॉइलिव्हरे म्हणाले की, कॅनडा आता भारतासह जगातील जवळजवळ प्रत्येक मोठ्या शक्तीशी मोठ्या वादात आहे."माझा विश्वास आहे की जे लोक मालमत्तेचे नुकसान करतात किंवा हिंदू मंदिरांमध्ये नुकसान करतात त्यांना इतर प्रकरणांप्रमाणेच गुन्हेगारी आरोपांना सामोरे जावे लागेल."
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर आणि भारत सरकार यांच्यातील संबंध असल्याचा दावा केल्यानंतर भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले आहेत. जून महिन्यात कॅनडातील एका गुरुद्वाराबाहेर दोन अज्ञात हल्लेखोरांनी निज्जरची हत्या केली होती.