नवी दिल्ली, दि. 23 - लहान मुलांची उत्पादने बनवणारी प्रसिद्ध कंपनी जॉन्सन अँण्ड जॉन्सन या कंपनीला 2672 कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. अमेरिकेतील कोर्टाने जॉन्सन अँण्ड जॉन्सन या कंपनीला तसे आदेश दिले आहेत. वैयक्तिक प्रकरणात आतापर्यंतचा हा सर्वात मोठा खटला असल्याचं मानलं जात आहे. कंपनी या निर्णयाला आव्हान देण्याच्या तयारीत आहे.जॉन्सन अँण्ड जॉन्सन कंपनीची पावडर वापरल्यानं गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला होता. ज्यामध्ये कोर्टात महिलेच्या बाजूने निकाल देताना कंपनीला नुकसानभरपाई म्हणून त्या महिलेला 2672 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीने कॅन्सरचा धोका असल्याचा इशारा लहान मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांवर दिला नसल्याचं न्यायाधीशांनी म्हटलं आहे.
कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर जॉनसन अँड जॉनसनचे प्रवक्ते कॅरोल गुडरिच यांनी असे सांगितले की, पावडर वापरल्यामुळे कॅन्सर झाला, याचे कोणतेही सबळ पुरावे नाहीत. त्यामुळे आम्ही कोर्टाच्या निर्णयाविरोधात दाद मागू.
गुप्तांगाचा घाम स्वच्छ करण्यासाठी महिला या पावडरचा वापर करत होत्या, ज्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर झाला, असं या महिलांचं म्हणणं आहे. पावडर वापरल्यामुळे कॅन्सर झाल्याचा दावा अनेक महिलांनी जॉनसन अँड जॉनसन कंपनीच्या मुख्यालयात केला आहे. दरम्यान, यापूर्वीही कंपनीचा अशा पाचपैकी चार प्रकरणांमध्ये कोर्टात पराभव झाला आहे. त्यामुळे जवळपास आतापर्यंत कंपनीला 20 अब्ज रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र एवढा मोठा दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
यापूर्वीही द्यावी लागली होती 110 मिलिअन डॉलर्सची नुकसानभरपाई
अमेरिकेतील एका न्यायालयानं या कंपनीला तब्बल 110 मिलिअन अमेरिकन डॉलर्सची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला होता. जॉन्सन अँण्ड जॉन्सन कंपनीची पावडर वापरल्यानं अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतातील स्लेम्प नावाच्या एका महिलेला कॅन्सरला सामोरं जावं लागल्यानं ही भरपाई देण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे. केवळ अमेरिकेतच या कंपनीविरुद्ध हजारो खटले दाखल झाले आहेत. जगभरातील दाव्यांची संख्या एकत्र केली तर ही संख्या आणखीच मोठी होईल.
आलं आणि पुदिना वापरुन घरगुती उपाय -
आलं आणि पुदिना एकत्र करुन चांगला ठेचा. त्यात थोडं पाणी घाला. हा जाडसर लेप रोज चेहर्यावर लावा. काही दिवसांतच चेहरा तर उजळेलच, पण आपल्या त्वचेच्या तक्रारीही दूर होतील आणि चेहर्याला थंडावाही मिळेल. आजीबाईच्या बटव्यातल्या अशाच करामती आपल्या लहान बाळांसाठीही वापरता येतील. त्यासाठी कोणत्याही रासायनिक सौंदर्यप्रसाधनांची गरज नाही. मात्र ही आजीबाई मात्र खरोखरच आपल्या पारंपरिक ज्ञानात निष्णात असली पाहिजे.